• Download App
    महाविकास आघाडीत धाक दाखवून तिजोरी रिकामी करत होतात, मग निधीसाठी आता का रडता??; विजय वडेट्टीवारांचा अजितदादांना बोचरा सवाल Vijay vadettiwar targets ajit pawar over his succumbing to pressure of BJP

    महाविकास आघाडीत धाक दाखवून तिजोरी रिकामी करत होतात, मग निधीसाठी आता का रडता??; विजय वडेट्टीवारांचा अजितदादांना बोचरा सवाल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताफा मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आपले काका शरद पवारांची राजकीय संघर्ष करत असताना त्यांच्या नाराजीच्या बातम्या आल्या. आपल्याच पक्षातल्या आमदारांना निधी मिळत नाही, अशा तक्रारी अर्थमंत्री असलेल्या अजितदादांनी केल्या, असे बातम्यांमध्ये दिसून आले.Vijay vadettiwar targets ajit pawar over his succumbing to pressure of BJP

    या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली आहे. महाविकास आघाडीत असताना धाक दाखवून महाराष्ट्राची सगळी तिजोरी रिकामी करत होतात, मग आता निधीसाठी का रडता??, तुमच्याकडे अर्थ मंत्रालय आहे ना, मग आता तुमच्याच आमदारांना निधी का मिळत नाही?? कमळाबाईंचा आशीर्वाद असला की असेच घडणार, असा जबरदस्त टोला विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांना लगावला.



    विजय वडेट्टीवार म्हणाले

    • अजितदादा कधी खुश राहिले? ते नेहमीच नाराज असतात. मनाप्रमाणे झाले, तर खूश. मनाविरुद्ध झाले, तर नाराज. हम करे सो कायदा, आम्ही तसे वागू अशी त्यांची भूमिका आहे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये त्यांना वाटते की निधी मिळत नाही, अरे पण तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे, तरी निधीसाठी का रडता? आता तुमची धमक दाखवा ना!!
    • महाविकास आघाडीमध्ये धाक दाखवून सर्व तिजोरी साफ करत होतात. तीच धमक आता दादांनी दाखवावी. निधी मिळत नाही, म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्याला रडवण्याची हिंमत आहे का?? निधी मिळत नाही असे सांगून रडण्यापेक्षा दुसऱ्याना रडवण्याची हिंमत आहे का??, हे दादांनी आता दाखवून द्यावे. संजय राऊत म्हणतात त्या प्रमाणे ते दिल्लीचे चरणदास झाले आहेत. आता ते दादागिरी दाखवू शकत नाहीत.
    • दिल्लीत म्हणे त्यांनी तक्रार केली. आता असं सांगू नका की तक्रार करता करता ते तिथे रडले सुद्धा. तक्रारी पुरतेच दादांना मर्यादित ठेवा, आता रडण्याची स्थिती अजित पवारांवर आली असेल, कारण भारतीय जनता पक्षमध्ये जाणाऱ्यांना त्या पक्षाचे नेते रडवून रडवून सडवतात. त्यामुळे सडण्याची आणि रडण्याची वेळ अजित पवारांवर आली असावी.
    • पुढच्या वेळेस अजित पवारांना भाजपच्या तिकिटावरच लढावं लागेल असे मला एकंदरीत दिसते आहे. कमळावर लढल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. मी पूर्णपणे खात्रीने सांगू शकतो अजित पवार गटाला कमळाबाईचा आशीर्वाद असेच होणार!!

    Vijay vadettiwar targets ajit pawar over his succumbing to pressure of BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक