Vijay vadettiwar : अवघ्या राज्याला अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. यामुळे राज्यात राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायचा की फक्त काही जिल्ह्यांत ओला दुष्काळ करायचा याचा विचार सुरू असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची भीती आहे. Vijay vadettiwar said, We are thinking of declaring a wet drought
प्रतिनिधी
नागपूर : अवघ्या राज्याला अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. यामुळे राज्यात राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायचा की फक्त काही जिल्ह्यांत ओला दुष्काळ करायचा याचा विचार सुरू असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची भीती आहे.
विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, शेतकरी संकटात सापडल्यावर राज्य आणि केंद्र सरकारने दोघांनीही मदतीची भूमिका घ्यायची असते. यंदा प्रचंड पाऊस, वादळ आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वडेट्टीवार म्हणाले की, मराठवाड्यातील 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पाऊस ओसरला की 100 टक्के पंचनामे पूर्ण होईल. राज्य सरकारकडून एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत होईल. ओला दुष्काळ काही जिल्ह्यात जाहीर करायचा की संपूर्ण राज्यात जाहीर करायचा याबाबत विचार सुरू आहे. जिल्ह्यांमधील नुकसानीची माहिती गोळा झाल्यावर ओला दुष्काळाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकरी संकटात असल्यावर सर्वच पक्षांची शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका असते. मराठवाड्यात 17 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याची माहिती आहे. त्याहीपेक्षा अधिक नुकसान झालेलं असू शकतं.
Vijay vadettiwar said, We are thinking of declaring a wet drought
महत्त्वाच्या बातम्या
- महापौर किशोरी पेडणेकर : दोन डोस घेऊनही केईएम रुग्णालयात २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
- पुण्यात कोरोनाविरोधी लस आहे; पण, सिरींज नाहीत १७ हजार डोस उपलब्ध असताना द्यायचे ते कसे ?; महापालिका प्रशासनापुढे मोठा पेच
- गोव्यात काँग्रेस परिवार एकत्र, पण मतांची मात्र विभागणी!!; मग पराभव कुणाचा?
- कॅप्टन साहेब out of the way; अजित डोवाल यांच्याशी घरी जाऊन महत्त्वपूर्ण चर्चा!!
- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अटकेच्या भीतीने देश सोडून फरार?; तपास यंत्रणांना संशय