• Download App
    पवार काका - पुतण्याविरुद्ध शिवतारेंनी थोपटले दंड; म्हणाले, बारामती करणार "पवार मुक्त"!! Vijay shivtare drums band against pawar uncle - nephew in baramati

    पवार काका – पुतण्याविरुद्ध शिवतारेंनी थोपटले दंड; म्हणाले, बारामती करणार “पवार मुक्त”!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महायुतीत लोकसभेच्या जागा वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोंडी झालेली असताना बारामतीची लढत देखील त्यांच्यासाठी सोपी उरलेली नाही किंबहुना पवार काका – पुतण्यांसाठी ही लढाई राजकीय अस्तित्वाची ठरली आहे त्यातच आता अजित पवारांनी अपमानित केलेले पुरंदरचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीत पवार काका पुतण्यांविरुद्ध दंड थोपटून बारामती “पवार मुक्त” करण्याचा विडा उचलला आहे. नरेंद्र मोदी विचार मंचाची स्थापना करून त्यांनी बारामतीतून लोकसभेच्या निवडणुकीत पवार नणंद – भावजयी विरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. Vijay shivtare drums band against pawar uncle – nephew in baramati

    विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडली

    ती अशी :

    अजित पवार बारामतीतून जिंकू शकणार नाहीत. कारण, त्यांचा उर्मटपणा. याला पाडा. त्याला पाडा. ही त्यांची उर्मट भाषा त्यांना नडणार आहे. मी 1000 % ही निवडणूक लढणार आहे.

    बारामती मतदारसंघ कुणाचा सातबारा नाही. त्यामुळे पवार..पवार करण्याऐवजी निश्चितच आपण लढले पाहिजे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांच्या विरोधात प्रचार हा राजकारणाचा एक भाग आणि माझे कर्तव्य म्हणून केला होता. वैयक्तिक हितासाठी प्रचार केला नव्हता.



    पण, अजित पवारांनी असभ्येतीची नीच पातळी गाठली. मी 23 दिवस लीलावती रुग्णालयात दाखल होतो. मी रूग्णवाहिकेच्या माध्यमातून विधानसभेचा प्रचार केला. तेव्हा अजित पवारांनी पालखीतळावर येऊन म्हणाले होते ‘मरायला लागला आहे, तर कशाला प्रचार करताय?? लोकांची सहानुभूती घेण्यासाठी खोटं बोलत आहात. माझ्या गाडीच्या नंबरापर्यंत खालच्या स्तरावर अजित पवार आले होते. राजकारणात निवडून आणण्यासाठी सकारात्मक प्रवृत्ती असावी. पण तेव्हा अजित पवारांनी उर्मट भाषा केली होती.

    महायुतीत आल्यानंतर मी अजित पवारांची भेट घेतली. पण, तरीही त्यांची गुर्मी तशीच होती. दौंडमधील नागरिकांनी म्हटले की, अजितदादा उर्मट आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळेंना मतदान करणार आहेत.

    पुरंदरचे लोकं बदला घेण्याबद्दल बोलत आहेत. पण, नियती बदला घेईल. पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर अजित पवारांची विश्वाससार्हता संपली होती. त्यामुळे बारामती मतदारसंघातील घराणेशाही आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना निवडणुकीचा हक्क मिळण्यासाठी मी लढणार म्हणजे लढणार!!

    पवार विरुद्ध बारामतीतील सर्वसामान्य माणूस अशी ही लढाई असणार आहे. सर्वांना पवारांनी त्रास दिला आहे. भोरचे अनंतराव थोपटे 1999 मध्ये मुख्यमंत्री झाले असते. पण, त्यांना पवारांनी पाडले. संग्राम थोपटेंना महाविकास आघाडीत महाविकास आघाडीत मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष अजित पवारांनी होऊ दिले नाही. आम्ही पुण्याचे मालक अशी अजित पवारांची मानसिकता आहे. लोकसभेला हर्षवर्धन पाटलांकडून मतदान करून घ्यायचे आणि विधानसभेला त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करायचे. अशी फसवेगिरी अजित पवारांनी केली. लोकांना फसवणे हा त्यांचा जन्मजात अधिकार आहे, असेच त्यांना वाटते. असा हल्लाबोलही शिवतारेंनी अजित पवारांवर केला आहे.

    Vijay shivtare drums band against pawar uncle – nephew in baramati

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा