विशेष प्रतिनिधी
मुंबई : Dadar station भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन सुरक्षा बैठक घेतली. या बैठकीचा उद्देश सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेणे आणि राज्यभरातील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेणे होता. दरम्यान महाराष्ट्राला अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.Dadar station
दादर स्टेशन जवळील स्वामीनारायण मंदिरा जवळ पोलिसांकडून मॉक ड्रिल करण्यात आली. पोलिसांनी स्वामीनारायण मंदिरा कडील संपूर्ण रस्ता हा रोखून ठेवला. सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी एका साईडला उभे करून ठेवले. यामध्ये आतंकवादी यांना कशाप्रकारे पकडले हे दाखवण्यात आले त्याचप्रमाणे जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयात पोलिसांच्या गाडीतून घेऊन जाण्यात आल्याचे चित्र या मॉक ड्रिल मध्ये दाखवण्यात आले. मात्र अचानक पोलिसांकडून ही मॉक ड्रिल करण्यात आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.
दादर स्टेशन जवळील स्वामीनारायण मंदिरा जवळ पोलिसांकडून मॉक ड्रिल
पोलिसांनी स्वामीनारायण मंदिरा कडील संपूर्ण रस्ता हा रोखून ठेवला. सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी एका साईडला उभे करून ठेवले. यामध्ये आतंकवादी यांना कशाप्रकारे पकडले हे दाखवण्यात आले त्याचप्रमाणे जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयात पोलिसांच्या गाडीतून घेऊन जाण्यात आल्याचे चित्र या मॉक ड्रिल मध्ये दाखवण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द
राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दादर चौपाटी बंद असल्याबाबत अफवा – मुंबई पोलिसांचे आवाहन
सध्या दादर चौपाटी बंद असल्याबाबतचा एक संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. हा संदेश बनावट असून दादर चौपाटी सुरू आहे.
आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळे व इतर अधिकृत माध्यमे यावरूनच प्राप्त झालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. समाज माध्यम, फॉरवर्डेड मेसेजेस किंवा अनधिकृत ऑनलाइन स्रोतांद्वारे प्रसारित होणाऱ्या कोणत्याही असत्या-पित बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे पाठवू नका. तुमचे सहकार्य चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यास मदत करेल, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे…
- प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करा.
- ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थे द्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
- ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागरण करा.
- केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’ चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्या.
- प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाज माध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅंडल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
- प्रत्येक जिल्हाधिकारी यांना आपत्कालीन फंड आजच देणार, ज्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करायची असतील तर ती तत्काळ करता येईल. याव्यतिरिक्त कोणताही महत्वाचा प्रस्ताव यासंदर्भात आला तर तो 1 तासात मंजूर करा.
- एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांची बैठक घ्या, त्यांनाही ‘ब्लॅकआऊट’ बाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा. यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्या.
- पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
- सैन्याच्या तयारी संबधित गतिविधीचे चित्रीकरण करणे आणि ते समाज माध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा आहे, त्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा.
- सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या
- नागरिकांना परिस्थितीबाबत अद्ययावत व खरी माहिती पोहोचवणे यासाठी शासनाकडून व्यवस्था उभी करा.
- शासनाच्या अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधा (उदा. विद्युतनिर्मिती, वितरण) यावर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून त्वरित सायबर ऑडिट करून घ्या
- सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याचे तिन्ही दल तसेच कोस्टगार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीत व्हीसी माध्यमातून निमंत्रित करा.
Vigilance in Maharashtra; Police conduct mock drill at Swaminarayan Temple near Dadar station; CM’s meeting
महत्वाच्या बातम्या
- Colonel Sophia कर्नल सोफिया म्हणाल्या- पाकिस्तान नागरिकांचा ढाल म्हणून वापर करतोय; 400 ड्रोन उडवले
- BCCI : भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL-2025 स्थगित; BCCI ने घेतला मोठा निर्णय
- Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!
- Nishikant Dubey : सुप्रीम कोर्टाने म्हटले- निशीकांत दुबे यांचे विधान बेजबाबदार; आम्ही फुले नाही जी अशा विधानांनी कोमेजतील