• Download App
    'विधि विधान इंटर्नशिप'मुळे विद्यार्थ्यांना कायदेविषयक मोलाचे ज्ञान मिळेल - फडणवीस|Vidhi Vidhan Internship will provide valuable legal knowledge to students Fadnavis

    ‘विधि विधान इंटर्नशिप’मुळे विद्यार्थ्यांना कायदेविषयक मोलाचे ज्ञान मिळेल – फडणवीस

    अशा पद्धतीचा उपक्रम सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आपल्या महाराष्ट्रात नव्याने सुरु होणाऱ्या ‘विधि विधान इंटर्नशिप’चे उद्घाटन काल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी विविध अधिकारी, इंटर्नशिप करणारे विद्यार्थी व अन्य मान्यवर उपस्थित होते.Vidhi Vidhan Internship will provide valuable legal knowledge to students Fadnavis

    राज्यात कायदेविषयक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विधी व न्याय विभागाच्या विधि विधान शाखेबाबत माहिती व्हावी व त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी हा कार्यक्रम सुरु केला आहे. विधी व न्याय विभागाच्या विधी विधान शाखेमध्ये 600 अर्जदारांमधून निवाड झालेल्या 10 विद्यार्थ्यांकरीता 6 आठवड्यांसाठी हा इंटर्नशिप उपक्रम आहे. अशा पद्धतीचा उपक्रम सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.



    फडणवीस म्हणाले, विधी व न्याय विभाग शासनाचे बॅक बोन आहे. आपल्या संविधानाने अतिशय उत्तम व्यवस्था उभी केली आहे. चेक ॲण्ड बॅलन्ससोबतच अधिकारांचे विकेंद्रीकरण देखील आहे. या व्यवस्थेत शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्या विद्यार्थ्यांनी शिकून घ्याव्यात.

    याचबरोबर 2014 ते 2019 या काळात मी मुख्यमंत्री असताना ‘सीएम इंटर्न’ व ‘सीएम फेलोशीप’ हे उपक्रम सुरु केले होते. या माध्यमातून युवकांना शासनासोबत काम करण्याची संधी मिळाली व तरुणांच्या नवनवीन कल्पनांमुळे राज्याच्या विकासात मोलाची भर पडली. महाराष्ट्र देशात स्टार्टअपमध्ये अव्वल स्थानावर आहे आणि ही स्टार्टअप पॉलिसी आपल्या सीएम फेलोंनी तयार केली होती. तसेच ‘मागेल त्याला शेततळे’ हा कार्यक्रम देखील सीएम फेलोंनी तयार केला होता. अशी माहिती फडणवीसांनी दिली.

    याशिवाय त्यामुळे या विधि विधान इंटर्नशिपमुळे इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना कायदा कसा तयार होतो, याचे ज्ञान मिळेल व त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी हा कार्यक्रम मोलाचे मार्गदर्शन करेल. अशी फडणवीसांनी अपेक्षा व्यक्त केली.

    Vidhi Vidhan Internship will provide valuable legal knowledge to students Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!