• Download App
    फ्रान्सच्या किनाऱ्यावर सावरकरांचा पुतळा उभारणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar's discussion with Home Minister Amit Shah

    फ्रान्सच्या किनाऱ्यावर सावरकरांचा पुतळा उभारणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा

    • स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या प्रयत्नांना यश

    प्रतिनिधी

    मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीशांविरोधात सशस्त्र क्रांतीचा लढा देताना अटक झाल्यानंतर फ्रान्सच्या समुद्रात मार्साय बंदराजवळ “मोरिया” या बोटीवरून ८ जुलै १९१० रोजी मारलेली उडी त्रिखंडात गाजली. हा दिवस संपूर्ण देशभरात “साहस दिन” म्हणून साजरा केला जातो. सावरकरांच्या या उडीने संपूर्ण जगात भारतीय क्रांतिकार्याचा डंका वाजला. Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar’s discussion with Home Minister Amit Shah

    सावरकरांचा खटला हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात लढला गेला. त्यामुळे फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जावे यासाठी २० ऑक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेऊन चर्चा केली आहे.

    दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक फ्रान्समध्ये सावरकरांचे स्मारक व्हावे यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्मारक उभारणीची संकल्पना असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिल्ली दौऱ्यात याबाबत पुढील कार्यवाहीच्यादृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

    सावरकरांची प्रेरणा भावी पिढीला मिळावी

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या या ऐतिहासिक उडीला ८ जुलै २०२२ रोजी ११२ वर्षे पूर्ण झाली. ते औचित्य साधून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये त्यांच्या तैलचित्राचे अनावरण विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले होते. याप्रसंगी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी त्रिखंडात गाजलेल्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्व असलेल्या या प्रेरणादायी कृतीचे भावी पिढ्यांना चिरस्मरण व्हावे यादृष्टीने फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक व्हावे आणि त्यासाठी विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. राहुल नार्वेकर यांनी यावेळी बोलताना यासंदर्भात आपण व्यक्तिश: लक्ष घालून पाठपुरावा करू असे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याला विशेष महत्त्व आहे.

    Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar’s discussion with Home Minister Amit Shah

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Kisan : किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता या आठवड्यात येण्याची शक्यता; PM मोदी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात करणार ट्रान्सफर

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य

    Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन: बिहार मतदार यादीवरून विरोधक आक्रमक; सरकारकडून 7 महत्त्वाची विधेयके सादर होणार