• Download App
    नागपूर विधानपरिषद निवडणुकिमध्ये भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजयVictory of BJP candidate Chandrasekhar Bavankule in Nagpur Assembly elections; BJP candidates won the other three seats

    नागपूर विधानपरिषद निवडणुकिमध्ये भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय; अन्य तीन जागी भाजपचे उमेदवार जिंकले

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला. काँग्रेसनं पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशममुख यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे सहा जागांपैकी बावनकुळे यांच्यासह चार भाजपचे उमेदवार विजयी झाले आहे. या विजयाबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. Victory of BJP candidate Chandrasekhar Bavankule in Nagpur Assembly elections; BJP candidates won the other three seats

    देवेंद्र फडणवीस यांनी या विजयानंतर आनंद व्यक्त केला आहे. तसेच महाविकासबआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. “तीन पक्ष एकत्र आल्यानंतर सर्व विजय शक्य असतात हे गणित चुकल्याचे या विजयानं स्पष्ट केलं आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत.



    ते म्हणाले, “आज मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा विजय मिळाला आहे. खरंतर मी स्वत: निवडून आलो, तेव्हा झालेल्या आनंदापेक्षाही जास्त आनंद आज मला झाला आहे. या विजयाने महाविकास आघाडीला जोरदार चपराक बसली आहे.

    दरम्यान, अकोल्यात वसंत खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय मिळवला आहे. विधानपरिषदेच्या सहा पैकी चार जागी भाजप निवडून आला आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सगळ्या प्रकारचे विजय होऊ शकतात, असे मांडले जाणारे गणित चुकीचे आहे, असे या विजयानंतर स्पष्ट होत आहे. राज्यातली जनता भाजपच्या पाठिशी आह बावनकुळेंचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे”, असं फडणवीस म्हणाले.

    Victory of BJP candidate Chandrasekhar Bavankule in Nagpur Assembly elections; BJP candidates won the other three seats

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस