• Download App
    VHP Protest Mumbai Dipu Das Murder Bangladesh Photos VIDEOS Report बांगलादेशातील 'दिपू दास'च्या हत्येचे मुंबईत तीव्र पडसाद; कफ परेडमध्ये विश्व हिंदू परिषदेचे आंदोलन

    Dipu Das Murder : बांगलादेशातील ‘दिपू दास’च्या हत्येचे मुंबईत तीव्र पडसाद; कफ परेडमध्ये विश्व हिंदू परिषदेचे आंदोलन

    Dipu Das Murder

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Dipu Das Murder बांगलादेशात हिंदू समाजावर सुरू असलेले अत्याचार आणि तरुण दिपू चंद्र दास याची जमावाकडून झालेली निर्घृण हत्या, याच्या निषेधार्थ आज मुंबईत संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात मंगळवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.Dipu Das Murder

    बांगलादेशातील मैमनसिंग येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या 27 वर्षीय दिपू चंद्र दास या हिंदू युवकाची 18 डिसेंबर रोजी जमावाने अमानवी पद्धतीने हत्या केली होती. त्याच्या एका मुस्लिम सहकाऱ्याने त्याच्यावर ईशनिंदेचा खोटा आरोप केला होता. जमावाने दिपूला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचे प्रेत एका झाडाला टांगून पेटवून देण्यात आले. या प्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे, मात्र या घटनेमुळे जगभरातील हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे.Dipu Das Murder



    मुंबईत कफ परेड परिसरात तणाव

    या घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील कफ परेड भागात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत बांगलादेश सरकार आणि कट्टरपंथीयांविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी दिपू दास याला न्याय देण्याची आणि बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणाची मागणी केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता आणि आंदोलनाला सुरुवात होताच अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.

    दरम्यान, बांगलादेशमधील या घटनेच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीसह कोलकात्यातही तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. बांगलादेशात हिंदूंचे जगणे कठीण झाले आहे. दिपू दासची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली, ती माणुसकीला काळिमा फासणारी आहे. भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणून तिथल्या हिंदूंच्या सुरक्षेची हमी मिळवावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

    VHP Protest Mumbai Dipu Das Murder Bangladesh Photos VIDEOS Report

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुंबईत बेस्टच्या सर्वांगीण विकासासाठी फडणवीस सरकारची महत्त्वाची पावले; सर्व आगारांचा विकास, मुंबईच्या वेशीवरच बाहेरून येणाऱ्या बसगाड्यांसाठी पार्किंग!!

    Eknath Shinde : विजयाचे चिन्ह दाखवत शिंदेंचा मोठा दावा; ‘महायुतीचा झेंडा विधान परिषदेतही फडकणार’

    Fadnavis Government : मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; शैक्षणिक शुल्कापासून वसतिगृहापर्यंत मिळणार विशेष सुविधा