मराठी नाटक, चित्रपट, मालिका यासह हिंदी चित्रपटामध्ये साकारल्या अजरामर भूमिका
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८८ वर्षी मुंबईत निधन झाले. जयंत सावरकरांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. Veteran actor Jayant Savarkar passes away
जयंत सावरकर यांचे ठाण्यातील रुग्णालयात निधन झाले असून, त्यांच्या पार्थिवावर २५ जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. जयंत सावरकर (अण्णा) यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वात आणि मालिका विश्वात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
मराठी नाटक, चित्रपट, मालिका यासह हिंदी चित्रपटामधून आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्षे जयंत सावरकर यांनी खास स्थान निर्माण केले होते. मात्र वृद्धापकाळामुळे मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. याशिवाय जयंत सावरकर यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषविले होते.
जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे १९३६रोजी गुहागर येथे झाला. वयाच्या विसाव्या वर्षी १९५४ पासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली होती आणि वयाच्या ७३ व्या वर्षांपर्यंत ती सुरूच राहिली.
Veteran actor Jayant Savarkar passes away
महत्वाच्या बातम्या
- पोर्ट सुदान विमानतळावर प्रवासी विमान कोसळले, चार लष्करी जवानांसह नऊ जणांचा मृत्यू!
- अजितदादांची मुख्यमंत्री पदाची पोस्टर्स; भाजप नेत्यांचा इशारा; त्यानंतर सुनील तटकरेंचा चर्चेवर पडदा!!
- शिंदे – फडणवीसांच्या देखरेखीखाली अजित दादांचे निधी वाटप; पण आता ते ठाकरे गटाच्या टीकेचे धनी!!
- नुसते मोदी – योगींच्या नावांवर अवलंबून राहू नका, संघटना वाढवा; बी. एल. संतोष यांनी घेतला भाजप कार्यकर्त्यांचा क्लास!!