• Download App
    मराठा आहे हिशेब इथेच चुकता करणार; भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि पोलिसांचे खटके । Verbal clash between BJP MLA Ravindra Chavan and police in Dombivali

    मराठा आहे हिशेब इथेच चुकता करणार; भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि पोलिसांचे खटके

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि पोलिसांचे डोंबिवलीत आयोजित एका लोकार्पण कार्यक्रमाआधी खटके उडाले. भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि पोलिसांसोबत शाब्दिक चकमक उडाल्यानंतर कार्यक्रमस्थळी बंदोबस्तात वाढ झाली. आमदार रवींद्र चव्हाण यांचा आसनावर बसण्यावरून वाद झाला. तेव्हा माझ्याकडून काही चूक होणार नाही. तुमच्याकडून जे झाले आहे ते लक्षात ठेवा. आम्ही मराठा आहोत हिशेब येथेच चुकता करणार, असे चव्हाण म्हणाले. Verbal clash between BJP MLA Ravindra Chavan and police in Dombivali

    कोपर पुल लोकार्पणाचा कार्यक्रम सावित्रीबाई रंग मंदिरात आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला हॉल मध्ये प्रवेश करताना भाजपा कार्यकर्त्यानी घोषणा दिल्या. यावेळी आमदार चव्हाण यांची नाराजी उघडपणे दिसून आली.

    पोलिसांनी आमदार चव्हाण याना आसनस्थ व्हायला सांगितलं. मात्र आमदार चव्हाण यानी मी कुठं चुकणार नाही, माझ्याकडून काही चूक होणार नाही, आपल्याकडून जे झाल ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे ,आपण मराठा आहोत जो काही हिशेब आहे तो इथल्या इथेच चुकता करेन, असे पोलिसांना सांगितले .पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र,त्यांनी बसण्यास नकार दिला. भाषणात मला जे काही बोलायचे आहे ते बोलणार त्यांनी सांगितले.

    मराठा आहे हिशेब इथेच चुकता करणार

    लोकार्पण कार्यक्रमाआधी उडाले खटके

    कार्यकर्त्याच्या घोषणाबाजीने आमदार नाराज

    पोलिसांचा आसनस्थ होण्याची विनंती फेटाळली

    Verbal clash between BJP MLA Ravindra Chavan and police in Dombivali

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!