वेंकीज कंपनीच्या नावाने बनावट वेबसाईट आणि युटयूब चॅनेल काढून गुंतवणूकादारांचा जादा व्याजदराने आमिष दाखवण्यात आले. यानंतर त्यांच्याकडून भारत पे वॉलेटवर पैसे भरावयास लावून फसवणूक करण्यात आली.
विशेष प्रतिनिधी
पुणे -वेंकीज कंपनीच्या नावाने बनावट वेबसाईट आणि युटयूब चॅनेल काढून गुंतवणूकादारांचा जादा व्याजदराने आमिष दाखवण्यात आले. यानंतर त्यांच्याकडून भारत पे वॉलेटवर पैसे भरावयास लावून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कंपनीच्या वतीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.कंपनीच्या वतीने रोहन अजय भागवत ( 32,रा.आझाद मित्र मंडळाजवळ,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार मोहंमद वाहिद, संतोष यादव, प्रेम साहू, रंजन कुमार आणि प्राजा टेक कंपनीविरुध्द आयटी ऍक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Venkiys company name Fake YouTube channel and website started by some persons and cheated the investers
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी वेंकिज इंडिया लिमिटेड कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीची वेबसाईट, मालकाचा फोटो आणि लोगोचा वापर करुन आरोपींनी वेंकिजफार्म डॉट नेट नावाने बनावट वेबसाईट तयार केली. तसेच यु ट्युब चॅनेल तयार करुन त्यावरही कंपनीचा लोगो, मालकाचा फोटो वापरुण नागरिकांना कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.
गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याची जाहिरातही केली. वेंकिज फर्म मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकीचा मोबदला म्हणून बॅंक खात्यात दर आठवड्याला ठराविक रक्कम देण्याचे आमिष दाखवले गेले. नागरिकांचे पैसे ऑनलाईन पध्दतीने भारत पे वॉलेटवर घेऊन फसवणूक केली. काही गुंतवणूकदारांनी मोबदला मिळत
नसल्याने कंपनीशी संपर्क साधल्यावर कंपनीला त्यांची बनावट वेबसाईट आणि यु ट्यूब चॅनेल असल्याचे कळाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली.याप्रकरणाच तपास पोलीस निरीक्षक विजय खोमणे करत आहेत. दरम्यान, कंपनीच्या नावाने नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून ही तक्रार देण्यात आल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
Venkiys company name Fake YouTube channel and website started by some persons and cheated the investers
महत्त्वाच्या बातम्या
- भोंग्यांची ढकला – ढकली!! : संजय राऊतांची केंद्रावर; वळसे पाटलांची सर्वपक्षीय बैठकीवर!!
- Raj Thackeray : आता मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मनसे नेते बाळा नांदगावकरांची मागणी!!
- लिंबू झाले महाग? या गोष्टींमधून मिळवा पुरेसे व्हिटॅमिन सी
- लुधियाना मध्ये झोपडीला आग लागून सात जण जिवंत जळाले