विशेष प्रतिनिधी
पुणे : कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत वाहन शिरल्याने झालेल्या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू तर ३० जण जखमी झाले आहेत. Vehicle hit to Alandi’s Dindi; Two Warkaris killed, 30 injured
हा अपघात शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झाला. कान्हेफाटा येथे ही दुर्घटना घडली. यानंतर पिकअप चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
खालापूर उंबरी गाव येथून सुमारे दीडशे वारकरी हे आळंदीच्या दिशेने कार्तिकी यात्रेनिमित्त निघाले होते. हरिनामाचा गजर करत वारकरी रस्त्याच्याकडेने जात होते. तेव्हा पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले आणि वारकऱ्यांच्या रांगेच्या मधोमध जाऊन काही जणांना धडक दिली.
Vehicle hit to Alandi’s Dindi; Two Warkaris killed, 30 injured
महत्त्वाच्या बातम्या
- मेंदूचा शोध व बोध : मेंदूची अंतर्गत क्लिष्ट रचना एखाद्या भव्य कारखान्यासारखीच
- लाईफ स्किल्स : शरीरसंपदेसाठी आहारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने वाढवा
- वर्षा गायकवाड : पहिलीपासून द्वैभाषिक अभ्यासक्रम लागू करण्याचे निर्देश ,विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेची अडचण दूर होणार
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : संगणकही शिकणार आता माणसाची भाषा