पुणे शहरासह सोलापूरमधून दुचाकींसह चारचाकीं वाहनांची चोरी करणाऱ्या सराईताला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून ८ दुचाकी आणि २ मोटारी असा मिळून तीन लाखांवर ऐवज जप्त करण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -पुणे शहरासह सोलापूरमधून दुचाकींसह चारचाकीं वाहनांची चोरी करणाऱ्या सराईताला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून ८ दुचाकी आणि २ मोटारी असा मिळून तीन लाखांवर ऐवज जप्त करण्यात आला आहे.बच्चनसिंग जोगेंदरसिंग भोंड (वय २३ रा.बिराजदार नगर हडपसर,पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. Vehical theft accused arrested by police and recovered eight two wheeler and two four wheeler cars
वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर आळा बसविण्यासाठी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी वैदवाडी परिसरील रेल्वे पुलाजवळ संशयित वाहनचोर थांबल्याची माहिती पोलीस नाईक शिवाजी जाधव यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून बच्चनसिंग याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने पुणे आणि सोलापूरमधून ८ दुचाकी आणि २ मोटारी चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, उदय काळभोर, राजेश लोखंडे, विनायक रामाने, शाकिर खान, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, सुदेश सपकाळ यांनी केली.
Vehical theft accused arrested by police and recovered eight two wheeler and two four wheeler cars
महत्त्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : मशिदींवरचे भोंगे उतरलेच पाहिजेत, अन्यथा महाराष्ट्रातल्या मनगटातील ताकद दाखवू; राज ठाकरेंची गर्जना!!
- Devendra Fadanavis : मशिदींवरचे भोंगे उतरवताना हातभर फाटली आणि म्हणे “यांनी” बाबरी मशीद पाडली!!; उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!!
- AAP Mumbai : ठाकरे बंधूंच्या घमासानाला तोंड देण्यासाठी आम आदमी पार्टीची जबाबदारी प्रीती शर्मा – मेननवर!!