वृत्तसंस्था
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर हे दाढीवाल्यांच्या विरोधात होते, असे अजब वक्तव्य संजय राऊत यांनी केल्याबरोबर लोकांनी बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे दाढीवाले फोटो टाकून संजय राऊत यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे!! महाविकास आघाडीची छत्रपती संभाजी नगरात वज्रमूठ सभा आहे. ती सोडून संजय राऊत दिल्लीत दाखल झाले आहेत. त्याच वेळी महाराष्ट्रात सगळीकडे शिवसेना – भाजपच्या सावरकर गौरव यात्रेची धूम आहे. Veer savarkar was against beard, claimed Sanjay Raut but targets RSS and eknath shinde
या पार्श्वभूमीवर दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर दाढीवाल्यांच्या विरोधात होते, असे अजब वक्तव्य केले आहे. त्यामुळेच लोकांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे दाढीवाले फोटो टाकून संजय राऊतांनाच उलटे सवाल केले आहेत. संजय राऊत म्हणाले, की जे लोक वीर सावरकरांची गौरव यात्रा काढत आहेत, त्यांना सावरकरांविषयी काही माहिती तरी आहे का?? सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारधारेत काहीही संबंध नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही सावरकरांचा हिंदुत्ववाद मानला नाही. सावरकर दाढीवाल्यांच्या विरोधात होते, मग एकनाथ शिंदे आता दाढी कापून फिरणार का??, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
अर्थात संजय राऊत यांचा मूळ रोख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींकडे होता. मात्र प्रत्यक्षात नाव घेताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले. परंतु संजय राऊतांनी सावरकर हे दाढीवाल्यांच्या विरोधात होते हे अजब वक्तव्य करताच लोकांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंट वर बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे दाढीवाले फोटो टाकून राऊतांनाच उलटे सवाल केले आहेत.
सावरकर दाढीवाल्यांच्या विरोधात होते की नाही माहिती नाही, पण ते काँग्रेसवाल्यांबरोबर नक्की नव्हते आणि आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काँग्रेसचा पदर पकडून उभे आहेत, असे शरसंधान अनेकांनी साधले आहे. जी काँग्रेस दिवस रात्र वीर सावरकरांना शिव्या देते त्यांच्या पदराखाली उद्धव ठाकरे आणि संजय राऊत लपले आहेत. तुम्ही आधी त्या काँग्रेसच्या पदराकडून बाहेर, या असा टोला देखील अनेकांनी राऊतांना लावला आहे. अर्थात सावरकर दाढीवाल्यांच्या विरोधात होते, हे संजय राऊत यांचे अजब वक्तव्य सोशल मीडियावर लोकांची करमणूक करते आहे.
Veer savarkar was against beard, claimed Sanjay Raut but targets RSS and eknath shinde
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये हिंसाचार सुरूच; सासाराममध्ये बॉम्बस्फोट तर गोळीबाराच्या आवाजाने नालंदामध्ये दहशत, संचारबंदीही लागू!
- धक्कादायक : ‘एलिझा’ चॅटबॉटसोबत सहा आठवडे बोलल्यानंतर बेल्जियममधील व्यक्तीची अखेर आत्महत्या!
- राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! आणखी एक मानहानीचा खटला हरिद्वार न्यायालयात दाखल
- नाशिकमधील वेदोक्त प्रकरण; संयोगिता राजेंच्या भूमिकेला संभाजीराजेंचा पाठिंबा