विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिक मध्ये नव्याने वेदोक्त प्रकरण घडल्याच्या बातम्या आहेत. कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या पत्नी संयोगिता राजे यांनी नाशिक मध्ये घडलेल्या काळाराम मंदिरातील वेदोक्त प्रकरणासंदर्भात आपल्या विविध सोशल मीडिया अकाऊंट वर एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांना काळाराम मंदिरातील कथित महंतांनी वेदोक्त पूजा नाकारल्याचा उल्लेख संयोगिता राजे यांनी केला आहे. त्यामुळे सोशल मीडियात एक वेगळे वादळ उठले आहे. संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांनी हा विषय नव्याने पुढे आणला आहे.Vedokt episode in nashik and loksabha Elections 2024
पण संयोगिता राजे यांनी लिहिलेली सोशल मीडिया पोस्ट आणि 2024 ची नाशिक लोकसभा निवडणूक यांचा काही अन्योन्न संबंध आहे का??, यावर नाशिक सह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झाली आहे. नाशिक मध्ये सर्व पक्षांच्या स्थानिक नेतृत्वामध्ये विशिष्ट अस्वस्थता निर्माण झाली आहे.
संयोगिता राजे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये वेदोक्त आणि पुराणोक्त या संदर्भात छत्रपती शाहू महाराज यांचा विशेष उल्लेख करून काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. संयोगिता राजे यांनी वेदोक्त पूजा कथित महंतांनी नाकारल्याचे म्हटले आहे. हे कथित महंत म्हणजे नेमके कोण??, याचा स्पष्ट उल्लेख संयोगिता राजे यांच्या पोस्टमध्ये नाही. त्याचबरोबर वेदोक्त पूजा नाकारली म्हणजे नेमके काय केले??, याचाही उल्लेख त्यामध्ये नाही. त्यामुळे काळाराम मंदिरातील पूजेत वेदोक्त पुराणोक्त असा संकल्प करून ही पूजा झाली किंवा कसे??, याचा खुलासा संयोगिता राजेंनी फेसबुक पोस्टमध्ये केलेला नाही.
अर्थात यातला वेदोक्त आणि पुराणोक्त हा वाद थोडा बाजूला ठेवला, तर 2024 च्या नाशिक लोकसभा निवडणुकीशी या वादाचा काही संबंध आहे का??, हे पाहणे महत्त्वाचे आहे. किंबहुना हा सर्वात कळीचा महत्त्वाचा मुद्दा आहे!!
स्वतः छत्रपती संभाजी राजे यांनी नाशिक मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची जाहीर घोषणा केली आहे. त्या दृष्टीने त्यांची राजकीय तयारी देखील नाशिक सुरू आहे. काही ज्येष्ठ, वरिष्ठ तरूण कार्यकर्ते यासाठी प्रयत्न करीत आहेत. नाशिकमध्ये शिवसेना – भाजप आणि बाकीचे पक्षांचे स्थानिक नेतृत्व संभाजी राजेंच्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी अनुकूल आहेत का??, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. किंबहुना तो सर्वाधिक मोठा कळीचा मुद्दा आहे!!
छत्रपती संभाजी राजे हे राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार होते. त्यामुळे त्यांनी स्वतःला सर्वच राजकीय पक्षांपासून जाणीवपूर्वक बाजूला ठेवले होते. सर्व पक्षांनी एकत्र येऊन मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या विशिष्ट महत्त्वाच्या मुद्यांसाठी आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी त्यांची राज्यसभा निवडणुकीच्या वेळी आणि आताच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राजकीय अपेक्षा आहे. त्यांची अपेक्षा राज्यसभा निवडणुकीच्या वेळी पूर्ण झाली नाही. मग ही अपेक्षा ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून 2024 ची निवडणूक लढवीत असताना पूर्ण होणार का??, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
संयोगिता राजे यांची वेदोक्त प्रकरणातील सोशल मीडिया पोस्ट आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातून संभाजी राजे यांची निवडणूक लढविण्याची इच्छा यासंदर्भात राजकीय वर्तुळात मोठा खल सुरू आहे. नाशिकच्या सर्व पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये राजकीय अस्वस्थता आहे. आता हे प्रकरण सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कसे वळण घेते??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Vedokt episode in nashik and loksabha Elections 2024
महत्वाच्या बातम्या
- TSPSC Paper Leak : तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवनाथ रेड्डी पोहचले ED कार्यालयात
- गिरीश बापटांच्या निधनानंतर तीनच दिवसांत काँग्रेसच्या वडेट्टीवारांची पोटनिवडणुकीची गडबड; अजितदादांनी संतापून सुनावले!!
- छत्रपती संभाजीनगर, मालवणीत दंगल; राज ठाकरेंनी आधीचे केले होते सावध; व्हिडिओ व्हायरल
- संजय राऊत सारखा भोंगा सकाळी ९ वाजता सुरू होतो आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवतो – चंद्रशेखर बावनकुळे