नाशिक : वंचित बहुजन आघाडीला नडला जास्त जागांचा हव्यास, की काँग्रेसला दाखवला कात्रजचा घाट??, असा सवाल विचारायची वेळ वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणाने मुंबईत आणली.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसशी आघाडी करताना प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडे सुरुवातीला 70 जागा मागितल्या. मुंबई महापालिका परिक्षेत्रात वंचित बहुजन आघाडीची फार मोठी ताकद आहे, असा आव वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आणला. काँग्रेसने सुद्धा बाकीच्या पक्षांची वाटाघाटी करण्याऐवजी वंचितला बरोबर घेणे पसंत केले. काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धुडकावले, पण वंचित बहुजन आघाडीला जवळ केले. काँग्रेसने वंचितला तब्बल 62 जागा दिले स्वतःकडे 139 जागा ठेवल्या.
– 62 पैकी 46 जागांवरच अर्ज
पण अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काल वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या वाट्याला आलेल्या 62 जागांपैकी फक्त 46 जागांवरच अर्ज दाखल केले. त्यामुळे 16 जागा रिकाम्या पडल्या. वंचित बहुजन आघाडीच्या या राजकारणामुळे काँग्रेसच्या नेत्यांना स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली. ज्या 16 जागांवर वंचितने अर्ज दाखल केले नाहीत, तिथे काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद होती. परंतु वंचितला नाराज करण्यात मतलब नाही, असे वाटून काँग्रेसच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीसाठी त्या जागा सोडल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात वंचित बहुजन आघाडीला तिथे उमेदवार देता आले नाहीत. त्यामुळे काँग्रेसची गोची झाली. काँग्रेसच्या नेत्यांनी तिथे बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केले. शेवटी काँग्रेसला त्या अपक्ष उमेदवारांना पाठिंबा द्यायची वेळ आली.
– वंचितशी युती काँग्रेसलाच लढली
या सगळ्यात वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसशी राजकारण खेळून तिला कात्रजचा घाट दाखवला का??, असा सवाल समोर आला. जर वंचित बहुजन आघाडीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवारच नव्हते, तर जास्त जागा मागायचा हव्यास का दाखवला?? उमेदवार मिळाले नाहीत, तर काँग्रेसला वेळीच का कळविले नाही??, जेणेकरून काँग्रेसला स्वतःच्या हाताचा पंजा चिन्हावर उमेदवार उभे करता आले असते, पण वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना उमेदवार नसल्याचे कळविले नाही. त्यामुळे मुंबईतल्या 16 जागांवर अपक्ष यांना पाठिंबा द्यायची वेळ काँग्रेसवर आली. वंचित बहुजन आघाडीशी केलेली युती काँग्रेसलाच नडली.
VBA could put applications only on 46 seats out of 62
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत ठाकरेच ठरले इतरांवर भारी; उमेदवारांच्या आकड्यांच्या हिशेबात मारली बाजी!!
- Bangladesh : बांगलादेशात हिंदू कुटुंबांच्या 5 घरांना आग लावली; दरवाजे बाहेरून बंद होते; पाच संशयितांना अटक
- ‘G RAM G Act : जी राम जी’ मुळे राज्यांना ₹17,000 कोटींचा फायदा; उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार सर्वात मोठे लाभार्थी
- नाशकात भाजपने आमदारांच्या घरातली तिकिटे कापली; पण विधानसभेच्या आयाराम अध्यक्षांच्या घराणेशाहीवर मेहेरबानी!!