शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि चौकशीच्या स्कॅनर खाली… पण तिची चौकशी करणार कोण आणि तिचा अहवाल देणार कसा??, कसा याविषयी ठळक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Vasantdada Sugar
शरद पवार वर्षांवरचे अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये बऱ्याच अनियमितता आहेत साखर कारखान्यांकडून आणि शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपयांचे अनुदान मिळवणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदाना प्रमाणात उपयोगी पडते का??, तिथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उपयोगी ठरणारे संशोधन होते का? सरकारकडून मिळणारे अनुदान वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट योग्य पद्धतीने वापरते का??, अशा बऱ्याच शंका कित्येक वर्षे शेतकरी आणि शेतकरी संघटना उपस्थित करीत होत्या. परंतु शरद पवारांचे वर्चस्व असलेल्या या संस्थेची कुठल्या सरकारने कधी चौकशी किंवा तपास केला नाही.
याखेरीस वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कडे अत्यंत अल्प दरात सरकारची भरपूर जमीन भाडेपट्ट्याने आहे त्या जमिनीचा वापर नेमका कोण, कसे आणि कशासाठी करते??, याविषयी सगळ्या महाराष्ट्रात दाट संशयाचे वातावरण आहे. परंतु, केवळ शरद पवार अध्यक्ष आहेत आणि राज्यातले बडे नेते संस्थेच्या नियामक मंडळावर आहेत. त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा कारभार कधी चौकशी आणि तपासाच्या स्कॅनर खाली येत नव्हता.
पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अनुदानासंदर्भातला चौकशी करायचा आदेश दिला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ला सरकार अनुदान देते त्या अनुदानाचा वापर संशोधनासाठीच होतो का??, यासंबंधीचा अहवाल साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीने दोन महिन्यांमध्ये सादर करावा, असे आदेश फडणवीस सरकारने दिले.
– पवारांच्या राष्ट्रवादीची आगपाखड
सरकारचे हे आदेश आल्याबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कान उभे राहिले. त्यांच्या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी फडणवीस सरकारवर आगपाखड केली. शरद पवारांना 85 व्या वर्षी फडणवीस त्रास देतायेत त्यांच्या नेतृत्वाखालच्या संस्थेला काळा डाग लावताहेत, असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला. वास्तविक पवार आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या संस्थेने जर काही अनियमितता केली नसेल, तर घाबरायचे कारण नाही, असा टोमणा राजू शेट्टी यांनी हाणला. त्यामुळे दोन्ही बाजूंचे राजकारण पेटले.
– शेतकऱ्यांचे अधिकार नाकारले
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला शेतकऱ्यांकडून देणगी गेली. तिचा वापर संस्थेने कसा केला, हे समजून घेण्याचा शेतकऱ्यांना अधिकार आहे, पण तो आत्तापर्यंत कधीच दिला गेला नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अप्रत्यक्ष हस्तक्षेपामुळे उसाची 265 (Co – 265) ही जात शेतकऱ्यांना पसंत असूनही कारखाने तो उस स्वीकारत नाहीत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये अनेकांचे clash of interests आहेत. त्यातून अनेक अनियमितता झाल्यात. पण इन्स्टिट्यूटही त्यांची आणि सरकारेही त्यांची अशी परिस्थिती असल्यामुळे संस्था कधी चौकशी आणि तपासाच्या स्कॅनर खाली येऊ शकली नाही. ती आता देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीच्या स्कॅनर खाली आणली, त्यामुळे तर राजकारण तापले.
– राजू शेट्टींचे गंभीर सवाल
पण या चौकशी संदर्भात मात्र राजू शेट्टी यांनी गंभीर सवाल उपस्थित केला, तो म्हणजे, ज्या साखर आयुक्तांच्या नेतृत्वाखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी होणार आहे, तिथे अनेकांचे हितसंबंध गुंतलेत. राष्ट्रवादीशी संबंधित अनेक नेते संस्थेच्या नियामक मंडळावर आहेत आणि तिथले शास्त्रज्ञ त्यांचे नोकर आहेत. अशा स्थितीत चौकशी होणार कशी आणि तिचा अहवाल कितपत पारदर्शक असेल??, संबंधित अधिकारी बड्या नेत्यांच्या हितसंबंधांच्या विरोधात खरी चौकशी करून खरा अहवाल देतील का??, याविषयी राजू शेट्टी यांनी सूचकपणे सवाल उपस्थित केले. या सवालांची खरी उत्तरे मिळाली, तरच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी “सफल” होऊ शकेल, अन्यथा तो एक राजकीय फार्स ठरेल.
Vasantdada Sugar Institute under Pawar’s chairmanship comes under the scanner of investigation
महत्वाच्या बातम्या
- हवामान विभागाचा अंदाज; पावसाचा पुन्हा धुमाकूळ, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज, तर उर्वरित महाराष्ट्राला यलो अलर्ट
- अजितदादा म्हणाले, काम करू दर्जेदार; कार्यकर्त्यांनी नागपूर कार्यालयात उडविला लावणीचा बार!!
- दिल्ली मेट्रोशी तुलना करून न्यूयॉर्क मेट्रोची पोलखोल; सगळीकडे घाण, सांडपाणी आणि कचऱ्याने भरलेले डबे गोल!!
- US-China : अमेरिका-चीन ट्रेड डीलची फ्रेमवर्क फायनल; ट्रम्प-शी जिनपिंग भेटीपूर्वी निर्णय