• Download App
    पहिलीपासून द्वैभाषिक अभ्यासक्रम लागू करण्याचे निर्देश ,विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेची अडचण दूर होणारVarsha Gaikwad: Instructions to implement bilingual course from the beginning, English language difficulty of students will be removed

    वर्षा गायकवाड : पहिलीपासून द्वैभाषिक अभ्यासक्रम लागू करण्याचे निर्देश ,विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेची अडचण दूर होणार

     

    येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिले.Varsha Gaikwad: Instructions to implement bilingual course from the beginning, English language difficulty of students will be removed


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात पहिलीपासून मराठी भाषेतून शिक्षण दिले जात असून विद्यार्थ्यांना भविष्यात इंग्रजी भाषेची अडचण येऊ नये यासाठी इंग्रजीतील संकल्पना बालपणापासूनच स्पष्ट होण्याची गरज भासते. यादृष्टीने येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिले.

    सध्या 488 आदर्श शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पहिलीच्या अभ्यासक्रमात एकात्मिक आणि द्वैभाषिक पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील वर्षी या शाळांमध्ये दुसरीच्या वर्गामध्ये अशा अभ्यासक्रमांचा समावेश करावा.


    बारावीच्या परीक्षेचे अर्ज आजपासून स्वीकारणार, वर्षा गायकवाड यांच्याकडून वेळापत्रकाची घोषणा


    वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांना मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतील संज्ञा, संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात,तसेच इंग्रजी भाषेतील शब्दांची ओळख व्हावी यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे द्वैभाषिक अभासक्रमाचा टप्प्याटप्प्याने इतर शाळांमध्ये देखील याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

    मराठी शब्दांच्या जोडीला समानार्थी आणि सोप्या इंग्रजी शब्द आणि वाक्यांचा वापर करण्यात यावा. पाठय़पुस्तकांची रचना आकर्षक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यात यावी, अशा सूचनाही वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.

    यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) संचालक विवेक गोसावी हे प्रत्यक्ष तर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर (ऑनलाईन) उपस्थित होते.

    Varsha Gaikwad: Instructions to implement bilingual course from the beginning, English language difficulty of students will be removed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस