प्रतिनिधी
पुणे : शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या जुन्या व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातला वारकरी समाज प्रचंड संतप्त होऊन सुषमा अंधारे यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे. सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्माची, देव देवतांची, संतांची आणि वारकरी संप्रदायाची टिंगल टवाळी करून बदनामी केली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कारवाई केलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी वारकऱ्यांनी केली आहे. वारकरी महाराष्ट्रभर ठिकठिकाणी सुषमा अंधारे यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. Varkari aggressive against Sushma andhare
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज सकाळी वारकऱ्यांची बैठक घेत त्यांना संयमाचा सल्ला दिल्याची बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे. वारकरी संप्रदायाविषयीच्या खऱ्या साहित्याचा प्रचार व्हावा असा सल्लाही पवारांनी वारकऱ्यांना दिल्याचे बातमी म्हटले आहे.
शरद पवारांनी वारकऱ्यांसमवेत सुमारे तासभर चर्चा केली. त्यांची भूमिका समजावून घेतली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित होते, असे बातमीत नमूद केले आहे.
Varkari aggressive against Sushma andhare
महत्वाच्या बातम्या
- 25 डिसेंबर 2022 : पंकज त्रिपाठीचा पहिला अटल लूक जारी; सिनेमा पुढच्या वर्षी रुपेरी पडद्यावर
- कचरा (अ)(गैर)व्यवस्थापन : पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला भरावा लागला 3500 कोटींचा दंड
- SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ जागांवरील भरतीसाठी 29 डिसेंबर पर्यंत करा अर्ज