विशेष प्रतिनिधी
पुणे : अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा बाई पण भारी देवा हा सिनेमा प्रचंड गाजला. किंवा महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्र बाहेर आणि परदेशात देखील या सिनेमांना वेगवेगळे रेकॉर्ड केले. या सिनेमात वंदना गुप्ते यांनी साकारलेली शशी मावशीची भूमिका चांगलीच गाजली. Vandana Gupte upcoming new movie
आता बाई पण भारी देवा या सिनेमानंतर वंदना गुप्त यांचा नवीन सिनेमा येऊ घातलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे यांच्या हस्ते या सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला. ‘रावण कॉलिंग ‘ या नव्या सिनेमातून वंदना गुप्ते नव्या भूमिकेतून आपल्याला भेटायला येणार आहेत.
विशेष बाब म्हणजे अभिनेत्री राणी गुणाजी आणि अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवतोय.रावण कॉलिंग’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मुलगा अमित राज ठाकरे यांनी सिनेमाच्या मुहूर्ताचा पहिला क्लॅप दिला.
संदीप दंडवते, संदीप बंकेश्वर आणि अभिषेक गुणाजी यांची सिनेमाला पटकथा आहे. तर अभिषेक गुणाजी आणि संदीप बंकेश्वर यांनी रावण कॉलिंग सिनेमाचं दिग्दर्शन केलंय..रावण कॅालिंग’मध्ये सचित पाटील, पूजा सावंत, वंदना गुप्ते, गौरव घाटणेकर, रवी काळे, बिपीन नाडकर्णी राजू शिसाटकर आणि सोनाली कुलकर्णी, मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या तरी हा चित्रपट कशावर आधारित आहे, याबाबत गोपनीयता असली तरी लवकरच या गोष्टी उलगडतील.
Vandana Gupte upcoming new movie
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीर : पुंछमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा मोठा प्रयत्न फसला, दोन दहशतवादी ठार
- नरसिंह राव हिंदुत्ववादी, तर मग सरदार पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, पुरुषोत्तमदास टंडन, के. एम. मुन्शी, कृपलानी हे कोण होते??
- कुणबी दाखला : मराठवाड्यातील निजामकालीन नोंदी तपासून आठवडाभरात अहवाल; मुख्यमंत्र्यांची घोषणा