• Download App
    गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड; जरांगे पाटलांचे कानावर हात!!|Vandalism of Gunaratna Sadavarte's car; Jarange Patal's hand on the ear!!

    गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड; जरांगे पाटलांचे कानावर हात!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तिकडे अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसऱ्या अंकातल्या दुसऱ्या दिवसाचा एपिसोड सुरू असताना इकडे गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड झाली. तीन तरुणांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या घरावर पाळत ठेवून आज सकाळी त्यांच्या गाडीची तोडफोड केली. मात्र त्या मुद्द्यावर जरांगे पाटलांनी ताबडतोब कानावर हात ठेवले आहेत. उलट सदावर्ते यांचे “श्रद्धेय” मराठ्यांना आरक्षण मिळू देत नाहीत, असा आरोप करीत संघ परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.Vandalism of Gunaratna Sadavarte’s car; Jarange Patal’s hand on the ear!!



    मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसऱ्या अंकाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र त्याच दिवशी मराठा आरक्षणाला कायदेशीर पातळीवर विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या घरावर पाळत ठेवून तीन युवकांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली. यानंतर परिसरामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविला. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी खाली येऊन आपल्या गाडीची पाहणी केली. त्यावेळी येथे मोठा जमाव जमला होता. गाडीची तोडफोड करणाऱ्या तीन युवकांना ताबडतोब अटक करण्यात आली आहे.

    त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मीडियाशी बोलताना मनोज जरंगे पाटलांच्या उपोषणाचे वाभाडे काढले. दुसऱ्याच्या घरावर पाळत ठेवून गाड्यांची तोडफोड करणे हीच जरांगे पाटलांच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या आहे का??, असा सवाल त्यांनी केला. जरांगे पाटलांचे फार लाड चाललेत. तेवढे लाड करू नका. त्यांना ताबडतोब अटक करा. कारण ते घटनाबाह्य आरक्षण मागत आहेत, असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

    त्यावर जरांगे पाटलांनी सदावर्ते यांना प्रत्युत्तर दिले. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या तोडफोडीशी मराठा समाजाचा काहीही संबंध नसल्याचे सांगून त्यांनी कानावर हात ठेवले. उलट त्यांचेच “श्रद्धेय” मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाहीत, असा आरोप करून जरांगे पाटलांनी संघ परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पण गाडीच्या तोडफोडी विषयी मात्र कानावर हात ठेवले.

    Vandalism of Gunaratna Sadavarte’s car; Jarange Patal’s hand on the ear!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस