• Download App
    BJP + AIMIM बाळासाहेबांचे शब्द उसने घेऊन वंचित बहुजन आघाडीचा भाजप + AIMIM जोडगोळीला टोला!!

    बाळासाहेबांचे शब्द उसने घेऊन वंचित बहुजन आघाडीचा भाजप + AIMIM जोडगोळीला टोला!!

    नाशिक : बाळासाहेबांचे शब्द उसने घेऊन वंचित बहुजन आघाडीचा भाजप + AIMIM जोडगोळीला टोला!!, असे आज घडले. जब प्यार किया तो डरना क्या??, असे वंचित बहुजन आघाडीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर लिहून एक व्हिडिओ शेअर केला.

    महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सगळेच पक्ष स्वतंत्रपणे लढल्यानंतर जो काही निकाल लागला, त्यातून सत्तेसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक सुद्धा एकत्र आले. याचेच उदाहरण अकोट, अकोला, छत्रपती संभाजी नगर आदी शहरांमध्ये दिसले. या शहरांमध्ये स्थानिक पातळीवरचे भाजपचे आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM चे नेते एकत्र तरी आले, किंवा त्यांनी सोयीच्या भूमिका घेऊन एकमेकांना आतून मदत तरी केली.

    – फडणवीस आणि जलील यांना टोला

    या विषयावरून भाजपच्या सगळ्या विरोधकांनी भाजपला ठोकून काढले. पण वंचित बहुजन आघाडीने बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द उसने घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना टोला हाणला. जब प्यार किया तो डरना क्या??, असे म्हणत एक मीमचा व्हिडिओ शेअर केला.



    – गोपीनाथ मुंडे – बरखा प्रकरण

    शिवसेना – भाजप युतीच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे बरखा प्रकरण गाजले होते. त्या बरखा प्रकरणात गोपीनाथ मुंडे यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत असताना बाळासाहेब ठाकरे मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. त्यांनी एका जाहीर सभेत प्यार किया तो डरना क्या??, असा डायलॉग मारून गोपीनाथ मुंडे यांचे जाहीर समर्थन केले होते. बाळासाहेबांच्या त्या वक्तव्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधातले वातावरण थंड पडले होते.

    पण आज वंचित बहुजन आघाडीने बाळासाहेबांच्या त्याच प्यार किया तो डरना क्या??, डायलॉगचा वापर करून भाजप आणि AIMIM यांना टोला हाणला. या दोघांच्या युती किंवा आघाडीच्या विरोधातले वातावरण तापतेच ठेवले.

    – बाळासाहेबांच्या शब्दांची उसनवारी

    वास्तविक वंचित बहुजन आघाडी आणि AIMIM यांनी जाहीरपणे काहीच वर्षांपूर्वी आघाडी करून निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना त्या निवडणुकीमध्ये अपयश आले होते. वंचित बहुजन आघाडीचा AIMIM पक्षाचा फायदा झाला पण त्यांच्या पक्षाचा आम्हाला फायदा झाला नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यानंतर या दोन्ही पक्षांची युती किंवा आघाडी झाली नाही. त्याचबरोबर भाजप आणि AIMIM या दोन्ही पक्षांनी निवडणूक लढविण्यापूर्वी कुठलीच आघाडी केली नाही, पण स्थानिक पातळीवरच्या राजकारणात मात्र ते सोयीनुसार एकत्र आले. पण त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीला त्या दोन्ही पक्षांना टोला हाणायची संधी मिळाली, पण त्यासाठी त्यांना बाळासाहेबांचे शब्द उसने घ्यावे लागले‌.

    Vanchit Bahujan Aghadi takes a dig at the BJP + AIMIM duo.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटीलांचा पोलिसांना अल्टिमेटम; आठवडाभरात नावे जाहीर करा, नाहीतर मी करतो; ड्रग्स रॅकेटमुळे पोलिस दल हादरले

    Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना मोठा दिलासा; ACB नंतर आता EDच्या प्रकरणातही निर्दोष सुटका

    शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन अंतिम टप्प्यात; 26 जानेवारी रोजी निकाल, पण जिल्हा परिषदांचा निकाल 6 फेब्रुवारी नंतर