• Download App
    वंचित सोबत आघाडी, आर्यनसारख्या पैसेवाल्यांना जामिन : खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे उदगार । vanchit aaghadi And Mim may Come together : owesi

    वंचित सोबत आघाडी, आर्यनसारख्या पैसेवाल्यांना जामिन : खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे उदगार

    वृत्तसंस्था

    औरंगाबाद : आगामी निवडणुकीत वंचित सोबत आघाडी करणार असल्याचे संकेत खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दिले. तसेच आर्यन खान सारख्या पैसेवाल्यांचा जमीन होतो; पण सर्वसाधारण मुसलमानांचा होत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. खासदार असदुद्दीन ओवैसी हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना बोलत होते. vanchit aaghadi And Mim may Come together : owesi

    २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोशल इंजिनीअरींगचा वापर करत असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम (MIM) पक्षासोबत तसेच इतर छोट्या संघटनांसमवे भाजप, सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांना विविध ठिकाणी तुल्यबळ लढत दिली.

    आंबेडकर-ओवैसी फॉर्म्युल्याचा सर्वात जास्त फटका राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच बसल्याचे पाहायला मिळाले. जवळपास ४० लाखांच्या वर मते मिळवत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने मोठी राजकीय ताकद दाखवून दिली होती, मात्र अंतर्गत कलहामुळे विधानसभेला वंचित आणि एमआयएम वेगळे लढले.



    मात्र, आता पुन्हा याच पॅटर्नची शक्यता निर्माण झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे असदुद्दीन यांची पत्रकार परिषदे ओवेसी यांनी वंचित-एमआयएम आघाडीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक आंबेडकर आणि ओवेसी एकत्रितपणे लढू शकतील, असा अंदाज ओवेसी यांच्या संकेतांवरून बांधला जाऊ शकतो. मात्र, राजकारणात काहीही अशक्य नसते. कधीही काही होऊ शकतं या सूत्रानुसार जर वंचितची तयारी असेल तर आम्ही जरूर आघाडी करू असेही ओवेसी म्हणाले.

    मराठा आणि ओबीसी आरक्षणाची लढाई राज्यात सुरु असतानाच आता मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मैदानात उतरली असून मुस्लिम आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईपर्यंत तिरंगा रॅली काढणार काढण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबर रोजी तिरंगे झेंडे हातात घेऊन एमआयएम वाहनांची रॅली काढणार आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही घोषणा केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. या रॅली आणि मोर्चानंतर मुंबईत अकबरुद्दीन ओवेसी आणि असदुद्दीन ओवेसी यांची सभा होणार असल्याची माहिती खासदार जलील यांनी दिली.

    vanchit aaghadi And Mim may Come together : owesi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस