• Download App
    Santosh Deshmukh संतोष देशमुख अपहरणावेळी वाल्मीक फोनवर

    Santosh Deshmukh : संतोष देशमुख अपहरणावेळी वाल्मीक फोनवर आरोपींशी बोलत होता; बीड कोर्टात एसआयटीचा युक्तिवाद, कराडला 7 दिवस कोठडी

    विशेष प्रतिनिधी

    बीड : Santosh Deshmukh  सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण झाले त्या वेळी वाल्मीक कराड, विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांच्यात फोनवरून १० मिनिटे संवाद झाल्याचा दावा एसआयटीने बुधवारी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात केला. त्याच्या तपासासाठी कराडला १० दिवस पोलिस काेठडी द्यावी, अशी मागणी केली. मात्र दोन्ही बाजूंचा दोन तास युक्तिवाद एेकल्यानंतर न्या. सुरेखा पाटील यांनी कराडला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.Santosh Deshmukh

    दोन कोटी खंडणी प्रकरणात कराडवर मंगळवारीच मकोका लावला होता. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र देशमुखच्या हत्या प्रकरणातही सहभागाच्या संशयावरून एसआयटीने ताब्यात घेतले होते. बुधवारी सकाळी एसआयटीने कराडला बीडच्या कारागृहातून ताब्यात घेतले. केज पोलिस ठाण्यात नेऊन हत्येच्या गुन्ह्यात अटक केली. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता ही सुनावणी केजऐवजी बीड न्यायालयात सुनावणी व्हावी, अशी विनंती एसआयटीने न्यायालयाकडे केली. ती मान्य झाल्यानंतर कराडला बीड कोर्टात नेले. सुनावणीनंतर दोन्ही गटांनी बाहेर घोषणाबाजी केली.



    कोर्टाचा प्रश्न : फक्त एका फोनवरून खुनात सहभाग स्पष्ट होतो का?… ‘खुनाच्या गुन्ह्यात आरोपीचा रोल स्पष्ट करण्याबाबत काही पुरावे आहेत का? कॉल रेकॉर्डमध्ये आरोपी थेट काही म्हणाला का? संतोष देशमुख याच्या हत्येतील त्याचा सहभाग तपासला आहे का? फक्त एक फोन केला या आधारावर तुम्ही आरोपीला खून प्रकरणात आरोपी केलंय का?’ असे सवाल न्यायालयाने पोलिसांना केले. मात्र याचाच तपास करण्यासाठी कोठडी हवी असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.

    धनंजय मुंडे तणावग्रस्त परळीत आले; पण घरातच बसून राहिले

    परळीत तणाव वाढत असल्याने मंत्री धनंजय मुंडे हे बुधवारी पहाटे मुंबईहून परळीत पोहोचले. कराडच्या समर्थनार्थ दिवसभर परळी शहर व तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात आंदोलन सुरू होते, बाजारपेठ बंद होती. मुंडे रस्त्यावर उतरून समर्थकांना शांत करतील, अशी अपेक्षा होती. पण त्यांनी दिवसभर घराबाहेर पडणे किंवा कुणाशीही संपर्क साधणे टाळले. वाल्मीक कराडच्या आईला ते भेटल्याची चर्चा होती, पण वाल्मीकच्या पत्नी मंजिली यांनी या वृत्ताचे खंडन केले.

    Valmik was talking to the accused on the phone during Santosh Deshmukh’s kidnapping; SIT’s argument in Beed court, Karad remanded in custody for 7 days

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस