• Download App
    विद्यार्थ्यांना कोरोनाविरोधी लस महाविद्यालय, विद्यापीठातच देणार ; लसीकरण १ मे पासून।Vaccines against corona will be given to students at colleges and universities; Vaccination from May 1

    विद्यार्थ्यांना कोरोनाविरोधी लस महाविद्यालय, विद्यापीठातच देणार ; लसीकरण १ मे पासून

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यातील १८ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांना कोरोनाविरोधी लस महाविद्यालय किंवा विद्यापीठातच देण्यात येणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. Vaccines against corona will be given to students at colleges and universities; Vaccination from May 1

    देशातील १८ वर्षांवरील नागरिकांना १ मेपासून लस देण्यास केंद्राने परवानगी दिली. सध्या राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठांशी ३६ लाख ८७० विद्यार्थी संलग्न आहेत. या विद्यार्थ्यांचे तेथेच लसीकरण करण्यात येणार आहे.



    याबाबत राज्यपाल, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अंतिम योजना जाहीर करण्यात येईल असे सामंत यांनी सांगितले.

    विद्यापीठांच्या कुलगुरूंशी बैठकीत चर्चा

    लसीकरण मोहिमेबरोबरच विद्यापीठांच्या परीक्षा, पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन याबाबत चर्चा झाली. शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यात येणार असून १५ दिवसांत निर्णय घेण्यात येईल. सर्व परीक्षा ऑनलाइनच होतील. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सर्वांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. विविध प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.

    Vaccines against corona will be given to students at colleges and universities; Vaccination from May 1

     

    Related posts

    Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    Anjali Damania : पार्थ पवारांचे जमीन घोटाळा प्रकरण, न्यायालयामध्ये जाण्याचा दमानियांनी दिला इशारा

    Uday Samant : शिंदे गटाने फेटाळली नाराजीची चर्चा, मंत्री उदय सामंत म्हणाले – आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना नाही तर कुणाला सांगणार