विशेष प्रतिनिधी
मुंबई – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबईतील डॉक्टर्स सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे डॉक्टरांचे लसीकरण झाल्याने त्यांना पूर्णपणे सुरक्षा मिळाली आहे. त्यामुळे पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत संक्रमित होणाऱ्या डॉक्टरांचे प्रमाण केवळ ५० टक्केच राहील आहे.Vaccination saves doctors from corona.
पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये सुमारे तीन हजार निवासी डॉक्टर्स आहेत. यापैकी बहुतेक डॉक्टरांनी लशीचे दोन्ही डोस घेऊन स्वत:चे संरक्षण केले आहे. पहिल्या लाटेत एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत केईएम रुग्णालयातील ७४४ कर्मचारी संक्रमित झाले होते.
त्यापैकी २२३ निवासी डॉक्टर होते. त्यातुलनेत दुसऱ्या लाटेत केवळ ३६६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, त्यातही डॉक्टरांची संख्या नगण्य आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांचे झालेले लसीकरण हेच आहे.
पहिल्या लाटेत सायन रुग्णालयातील ४५० डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात आले; तर दुसऱ्या लाटेत ही संख्या २५० वर आली. एवढेच नव्हे, तर लसीकरणामुळे डॉक्टरांना कमी संसर्ग झाला. तसेच त्यांच्यामध्ये एकही लक्षण आढळले नाही किंवा कोणालाही रुग्णालयात दाखल करावे लागले नाही.
Vaccination saves doctors from corona
महत्त्वाच्या बातम्या
- धमकाविण्याची फॅशन योग्य नाही, संसदेत निर्मला सीतारामन यांनी खासदारांना सुनावले
- करदात्यांना सीबीडीटीचा दिलासा, सहा प्रकारचे फॉर्म आणि स्टेटमेंट भरण्याची मुदत वाढविली
- लालूप्रसाद यादव यांचा चिराग पासवान यांना गळाला लावण्याचा प्रयत्न, तेजस्वी आणि त्यांनी एकत्र यावे अशी व्यक्त केली इच्छा
- गौतम अदानी यांनी केला ऑस्ट्रेलियन माजी पंतप्रधानांचा पाहुणचार, म्हणाले हॉकी, क्रिकेटमध्ये संघर्ष परंतु राष्ट्रीय हितासाठी आम्ही एकत्र