प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने युपी विरुद्ध मराठी असा वाद पेटवायचा प्रयत्न केला असला तरी हा वाद मिटविण्यासाठी एक नवी सूचना पुढे आली आहे. उत्तर प्रदेशातील शाळेत मराठीचे धडे शिकवण्याची सूचना भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केली आहे.Uttar Pradesh’s relationship with Marathi should be about education, not conflict; BJP leader’s letter to yogis
पण यामुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील तरुणांचा नोक-यांवरुन होणाऱ्या वादाचा नवा अंकही पाहायला मिळण्याचा धोका आहे. भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात कृपाशंकर सिंह यांनी योगींना उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये मराठी विषय शिकवण्याची विनंती केली आहे.
कृपाशंकर सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशच्या तरुणांना मराठी येत असेल, तर त्यांना मराठीमध्ये सरकारी नोक-या मिळणे सोपे जाईल, म्हणून यूपीमधील शाळांमध्ये मराठी शिकवले जावे. आश्चर्याची बाब म्हणजे ही सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे विचाराधीन असून, ती वाराणसीमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवली जाण्याचाही अंदाज आहे.
पत्र लिहिण्यामागचा हेतू
कृपाशंकर सिंह म्हणतात की, मी गेल्या 50 वर्षांपासून मुंबईत राहतोय. माझ्या अनुभवानुसार, जे लोक उत्तर प्रदेशातून स्थलांतरीत होऊन पुढील शिक्षणासाठी मुंबईत येतात, तेव्हा त्यांना महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरी करायची असेल तर अडचणीचा सामना करावा लागणार नाही. या हेतूने कृपाशंकर सिंह यांनी हे पत्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांंना लिहिले आहे. 10 वी आणि 12 वी च्या वर्गांत मराठी विषय असावा, अशी स्पष्ट मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
Uttar Pradesh’s relationship with Marathi should be about education, not conflict; BJP leader’s letter to yogis
महत्वाच्या बातम्या
- मुलीच्या लग्नासाठी वृद्ध महिलेची मैदान मोकळं करून देण्याची विनंती, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी स्वत; हातात फावडे घेऊन केली स्वच्छता
- द फोकस एक्सप्लेनर : राज्यसभा निवडणुकीत 29 आमदार ठरणार गेमचेंजर, आघाडीची नेत्यांची रात्री 50 मिनिटे बैठक, सपाची ठाकरेंवर नाराजी
- आता हवाई दल प्रमुखांनाही मिळू शकते CDS पद : हवाई दलाच्या नियमावलीत बदल; निवृत्त हवाईदल प्रमुख धनोआ यांचेही नाव शर्यतीत