येत्या तीन ते चार महिन्यांत पूर्ण मुंबईत विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणारं आहे. यामध्ये 55 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणारं आहेत.Use of electric vehicles for pollution free operation in Mumbai, 55 charging stations for vehicles in four months
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईला स्वच्छ आणि ग्रीन मुंबई बनवण्याची आवश्यकता आहे. यादरम्यान मुंईला प्रदूषण मुक्त करण्यासाठी मुंबई . महापालिकेने इलेक्ट्रिक वाहने आणायचे धोरण आखले आहे. यावेळी बेस्ट चे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा म्हणाले की येत्या तीन ते चार महिन्यांत पूर्ण मुंबईत विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणारं आहे. यामध्ये 55 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणारं आहेत. अस खाजगी आणि सार्वजनिक भागीदारीतून ही केंद्रे उभारली जाणार असल्याचे चंद्रा म्हणाले.
पुढे ते म्हणाले की मुंबईतील बेस्ट उपक्रमामध्ये २०२८ पर्यंत संपूर्ण बेस्ट बस ताफा इलेक्ट्रिक असेल.तर बेस्टच्या डबल डेकर बसेस इलेक्ट्रिक किंवा हायड्रोजन फ्यूएल सेल यापैकी जास्त सक्षम असेल. त्या उर्जेआधरे चालणाऱ्या असतील यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
बेस्ट च्या ताफ्यात पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होतो. बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगसाठी कुलाबा येथे चार्जिंग स्टेशन उभारले आहेत. सध्या बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या 6 इलेक्ट्रिक बसेस असून 2023 पर्यंत 1,900 इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होणार आहे.
मागील काही दिवसात आदित्य ठाकरे यांनी प्रदूषण कमी करण्यासाठी एक उपक्रम राबवला होता.यावेळी इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होत असल्याने जनजागृतीच्या उद्देशाने ऑटोकार इंडियाच्या वतीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत इलेक्ट्रिक कार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवला तसेच ठाकरे यांनी स्वतः इलेक्ट्रिक कार चालवून या रॅलीत सहभागही घेतला.
Use of electric vehicles for pollution free operation in Mumbai, 55 charging stations for vehicles in four months
महत्त्वाच्या बातम्या
- ZP Election Result 2021: पालघरचे सर्व निकाल जाहीर; भाजपा तीन, शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येकी दोन जागा, माकपा एका जागेवर विजयी
- देशात पहिल्यांदाच बलात्कार प्रकरणाच्या खटल्यात पाचव्या दिवशी शिक्षा, नराधमाला 20 वर्षांचा तुरुंगवास आणि 2 लाखांचा दंड
- Jioचे नेटवर्क डाऊन : सकाळी 9.30 पासून Jioच्या नेटवर्कमध्ये समस्या, कॉल आणि इंटरनेट वापरकर्ते त्रस्त
- शिरपूर पंचायत समितीची पोटनिवडणूक; भाजपचा सर्व सहाच्या सहा जागांवर विजय