विशेष प्रतिनिधी
मुंबई : अनेक वेळा कीटकांमुळे झाडांचे खोड कमकुवत होते. मुंग्या आणि इतर कीटक खोड पोखरतात. इतर कारणांनीही झाडे कमकुवत होतात. त्यावर महापालिका शास्त्रोक्त उपाय करणार आहे. जीर्ण झालेली, खोडातून पोखरलेली आणि जुनी झाडे वाचवण्यासाठी महापालिका आता थेट अमेरिकी तज्ज्ञांची मदत घेणार आहे. US scientist will help BMC for saving tress
झाडांच्या शास्त्रोक्त अभ्यासाबाबत जगभरात प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेच्या ‘इंटरनॅशनल सोसायटी ऑफ आर्बोरिस्ट’ संस्थेचा प्रमाणित अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तज्ज्ञांची नियुक्ती त्यासाठी करण्यात येणार आहे. मुंबईत तौत्के वादळाने मुंबईतील ८५० हून अधिक झाडे कोसळली होती. १२०० हून अधिक फांद्या पडल्या होत्या. त्यामुळे सुरवातीला ग्रँट रोड आणि मलबार हिलमधील झाडांवर शास्त्रशुद्ध उपाययोजना केल्या जाणार आहेत. प्रथम दीडशे ते दोनशे झाडे प्रयोगासाठी निवडण्यात येतील.
वाकलेले झाड काही टेकू लावून सरळ करता येईल का, झाड आतून पोकळ झाले आहे का, झाडाला वाळवी किंवा अन्य रोग लागला आहे का, इत्यादी मुद्द्यांची तपासणी करण्यात येईल. त्याप्रमाणे झाडाला औषधोपचार किंवा उपाययोजना सल्लागाराने सुचवणे अपेक्षित आहे. पावसाळ्यापूर्वी प्रयोगाला सुरुवात होणार असून दोन आठवड्यांत त्याबाबतचे सर्वेक्षण पूर्ण होईल.
US scientist will help BMC for saving tress
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनावरील उपचारासाठी बॅँका देणार वैयक्तिक कर्ज
- चीनचे नवे कुटुंब नियोजन धोरण जाहीर ; आता तीन मुलांना जन्म देण्यास परवानगी
- ओबीसी आरक्षणावरून ठाकरे – पवार सरकारला ठोक ठोक ठोकले; नंतर फडणवीस सिल्वर ओकवर जाऊन पोहोचले
- BIG BREAKING NEWS : देवेंद्र फडणवीस सिल्वर ओकवर; शरद पवारांची घेतली सदिच्छा भेट
- सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टच्या विरोधकांना दिल्ली उच्च न्यायालयाची सणसणीत चपराक; पीआयएलचा गैरवापर केल्याबद्दल ठोठावला १ लाखांचा दंड