विशेष प्रतिनिधी
पुणे : उर्फी जावेदची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. ती तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेक टेलिव्हिजन शो आणि बिग बॉसमधून तिला प्रसिद्धी मिळाली. मात्र आता त्यानंतर ती तिच्या फॅशनमुळे व्हायरल झाली. आता मात्र उर्फी जावेद एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्फीनं गुपचूप साखरपुडा केल्याच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. Urfi Javed engagement marathi news
यावेळी उर्फीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोंमुळे ती पुन्हा चर्चेत आली. या फोटोत उर्फी जावेद एका मिस्ट्री मॅनसोबत पूजा करताना दिसतेय. त्यामुळे आता उर्फीचा रोका झाल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप अभिनेत्रीने याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
या फोटोमध्ये एक व्यक्ती उर्फीसोबत बसलेली दिसतेय. या फोटोमध्ये दोघेही सोबत बसले असून हवन कुंडही फोटोत दिसत आहे. हे फोटो समोर आल्यानंतर नेटकरी आता या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.उर्फी जावेदच्या लुकनेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. ती काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. तिने कपाळावर गंध लावलेला दिसत आहे.
या फोटोमध्ये उर्फी जावेद मुलाला अंगठी देताना दिसतेय. मात्र तो मुलगा कोण आहे याबाबत काहीही माहीती समोर आलेली नाही. त्याचा चेहरा फोटोत स्पष्ट दिसत नाही. मात्र हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही हैराण झाले आहेत.
Urfi Javed engagement marathi news
महत्वाच्या बातम्या
- पक्ष सोडून उभा राहिलो, तर डिपॉझिटही जाईल; फडणवीसांचे वक्तव्य; पण इशारा कोणाला??
- महाराष्ट्रात भाजपच “बॉस” त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी निवडून आणण्याची जबाबदारी ही भाजपचीच; देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य
- राजस्थानः वंदे भारत रुळावरून उतरवण्याचे षडयंत्र, रुळावर दिसले दगड आणि लोखंडी सळ्या
- सफाई कामगारांच्या वस्तीला मुख्यमंत्र्यांची भेट; गांधीजींना आदरांजली; कामगारांच्या घरी जाऊन चहापान!!