• Download App
    आग्रीपाड्यातील नियोजित आयटीआयच्या जागी उर्दू भाषा भवन; बाल आयोगाची मुंबई महापालिकेला नोटीस Urdu Bhasha Bhavan in place of the planned ITI in Agripada

    आग्रीपाड्यातील नियोजित आयटीआयच्या जागी उर्दू भाषा भवन; बाल आयोगाची मुंबई महापालिकेला नोटीस

    प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आयटीआयसाठी आरक्षित असलेल्या जागेवर उर्दू भाषा भवन उभारले जात असून याला विधीमंडळात भाजपने तीव्र विरोध केला. याबाबत तक्रारही करण्यात आली होती. यामध्ये मुंबई महानगरपालिकेने मुलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचा (आयटीआय) प्रकल्प बंद करून त्या जागेवर उर्दू भाषा केंद्राचे बांधकाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या तक्रारीची दखल बाल आयोगाने घेतली असून पुढील 10 दिवसांच्या आत या विषयाबाबत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रीय बाल आयोगाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. Urdu Bhasha Bhavan in place of the planned ITI in Agripada

    नवाब मलिकांचे प्रताप

    महाविकास आघाडीचे सरकारमध्ये नवाब मलिक राज्याचे कौशल्य विकासमंत्री असताना भायखळ्याच्या आग्रीपाड्यातील ‘आयटीआय’ प्रशिक्षण केंद्राच्या जागेवर उर्दू भाषा केंद्र बांधण्याचा घाट घातला होता. नवाब मलिकांच्या खात्याने आयटीआय साठी आरक्षित असलेली जागा उर्दू भाषा केंद्रासाठी आरक्षित करून त्यासाठी तत्काळ १२ कोटींचा निधी देऊन काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

    मुंबई महानगरपालिकेने मुलांसाठी आयटीआयचा प्रकल्प बंद करून त्या जागेवर उर्दू भाषा केंद्राचे बांधकाम सुरू केल्याच्या तक्रारीची दखल घेत मुलांच्या/विद्यार्थी हितासाठी कारवाई करण्याकरिता राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने मुंबई महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. कारण आयटीआय प्रशिक्षण केंद्राच्या राखीव भूखंडावर आता उर्दू भवनचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

    औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा प्रकल्प बंद करून लाखो मुलांचा विविध कौशल्य विभागातील रोजगाराभिमुख प्रशिक्षण घेण्याचा हक्क हिरावून घेण्याच्या बेकायदेशीर निर्णयाबाबत तक्रार या विषयामध्ये राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे स्थानिक विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने मुंबई महानगरपालिकेला नोटीस बजावली असून येत्या दहा दिवसांच्या आत या विषयामध्ये कारवाई करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश बाल आयोगाने मुंबई महापालिकेला दिले आहे.

    महाविकास आघाडीच्या काळात भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव आणि तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी याठिकाणी उर्दू भाषा भवन बांधण्यासाठी महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजूर करताना त्यामध्ये निधीची तरतूद केली होती. त्यानंतर या जागेवर उर्दू भाषा भवन बांधण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी यशवंत जाधव यांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार कंत्राटदाराची नेमणूक झाल्यानंतर कामालाही सुरुवात केली जात आहे.

    Urdu Bhasha Bhavan in place of the planned ITI in Agripada

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!