विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : वारकरी संप्रदायात 60 % लोक प्रतिगामी घुसलेत. 40 % लोक वारकरी संप्रदाय विषयी योग्य मांडणी करतायेत बाकीचे 60 % लोक चुकीची मांडणी करतायेत, अशा आशयाचा लेख लिहून शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली. अमोल मिटकरी आणि रोहित पवार हे शरद पवारांच्या समर्थनासाठी बाहेर आले.Urban Naxals had infiltrated the Warkari sect; Devendra Fadnavis’ counterattack on Sharad Pawar!!
पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र वारकरी संप्रदायाविषयी स्पष्ट भूमिका घेऊन शरद पवारांचा लेख पूर्णपणे नाकारला.
– देवेंद्र फडणवीस म्हणाले :
– शरद पवार स्वतःला निधर्मी म्हणून घेतात. ते धर्म मानत नाहीत. त्यांचा मुळात वारकरी संप्रदायाशी संबंधच उरलेला नाही. मध्यंतरी त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी वारकरी संप्रदायाच्या मांडणीच्या विरोधातच चळवळ उभारली होती. वारकरी संप्रदायाचा विचार श्रद्धेचा, समतेचा आणि बंधुतेचा आहे. भागवत धर्माची पताका पुढे घेऊन जाणार आहे.
– मध्यंतरी वारकरी संप्रदायाच्या मूळ विचारांच्या विरोधात मांडणी करणारे काही घटक वारकरी संप्रदायात घुसले होते, पण वारकरी संप्रदायाने त्या घटकांना बाहेर काढले. त्यांचा संबंध अर्बन नक्षलवाद्यांशीची असल्याचा पुरावा सरकारला मिळाला. त्यांचे सगळे डॉजियर सरकारकडे आहे. त्यांची नावे सुद्धा सरकारकडे आहेत.
– शरद पवार जर वारकरी संप्रदायात घुसलेल्या तथाकथित प्रतिगाम्यांची नावे गोळा करणार असतील, तर मी त्यांच्याकडे वारकरी संप्रदायात घुसलेल्या अर्बन नक्षलवाद्यांची नावे पाठवून देईन.
Urban Naxals had infiltrated the Warkari sect; Devendra Fadnavis’ counterattack on Sharad Pawar!!
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसला महिला आरक्षणाला पाठिंबा, पण लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेला विरोध!!
- US-Iran : युद्धविरामानंतर पहिल्या तेल टँकरने पार केली होर्मुझ सामुद्रधुनी, UAE हून येत आहे भारतात
- Kedarnath Yatra 2026 : चारधाम यात्रा- केदारनाथमध्ये आता ‘नो रूम’ची चिंता संपली; 25 हजार यात्रेकरूंसाठी मुक्कामाची व्यवस्था
- पश्चिम बंगाल मध्ये लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना प्रत्येकी ३००० रुपये, सरकारी नोकरीत महिलांना ३३ % आरक्षण!!