• Download App
    यूपीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर होणार FIR दाखल, ठाकरेंच्या अडचणीत होणार वाढUP,Udhav Thackeray will be held on the FIR, Thackeray's distribution

    यूपीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर होणार FIR दाखल, ठाकरेंच्या अडचणीत होणार वाढ

    शिवसेनेकडून राणेंवर केलेली कारवाई ही सुडबुद्धीतून करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. आता शिवसेनेला जशासतसे उत्तर देण्यासाठी भाजप उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे.UP,Udhav Thackeray will be held on the FIR, Thackeray’s distribution


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर आता भाजप  चांगलच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतयं .भाजपने उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात FIR दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

    त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल २५ ऑक्टोबर २०२० च्या दसरा मेळाव्यात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन आता भाजप उद्धव ठाकरे यांच्याविरोधात FIR दाखल करणार आहे.



    नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा केली होती. त्यानंतर मग शिवसेना आक्रमक झाली आणि  शिवसैनिकांकडून राणेंविरोधात विविध पोलीस ठाण्यास तक्रार दाखल करण्यात आली.

    दरम्यान पोलिसांनी राणेंवर गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक करण्यात आली . त्यानंतर राणेंना जामीन मिळाला पण, शिवसेनेकडून ही कारवाई सुडबुद्धीतून करण्यात आल्याचा आरोप आता भाजपने केला आहे.

    आता शिवसेनेला जशासतसे उत्तर देण्यासाठी भाजप उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आहे.

    यूपी मुख्यमंत्री योगींच्या विरोधात केलेलं हे  वक्तव्य उध्दव ठाकरेंना आता भोवणार आहे.”आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालायला हा योगी चप्पल घालून जातो. वाटते तर असे की, तीच चप्पल घ्यावी आणि त्याच्या थोबाडात हाणावी”, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलं होतं.

    याचा आधार घेत भाजप शिवसेनेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. याचा व्हिडिओ भाजपने बुधवारी व्हायरल केला. यानंतर मुख्यमंत्र्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.

    दरम्यान विविध पोलीस ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे . त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुढे या प्रकरणात काय होतं याकडे सगळ्याचं लक्ष असणार आहे.

     in UP Udhav Thackeray will be held on the FIR, Thackeray’s distribution

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!