• Download App
    स्वर गंधर्व सुधीर फडके यांच्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!! |Upcoming movie Swaraj Aaj Sudhir phadke.

    स्वर गंधर्व सुधीर फडके यांच्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!!

    अभिनेता सुनील बर्वे हे साकारणार बाबूजींची भूमिका


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : ज्यांची ओळख स्वरगंधर्व अशी करून दिल्या जायची, ज्यांनी दिग्गज गदिमांच्या गीत रामायणाला स्वर साज चढवला . आणि मराठी घराघरात मनामनात गीत रामायण आपल्या जादुई आवाजाने अजरामर केलं असे मराठी संगीत क्षेत्रातील दिग्गज संगीतकार सुधीर फडके अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके बाबूजी यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . त्या सिनेमाचं नाव स्वरगंधर्व सुधीर फडके असं असणार आहे . Upcoming movie Swaraj Aaj Sudhir phadke.



    मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात बाबूजींच्या वाढदिवसाच्या दिवशी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते त्या मुहूर्ताचा प्रारंभ करण्यात आला. सुधीर फडके यांना स्वरगंधर्व म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. त्यांनी सुरुवातीला कोल्हापूरमधील वामनराव पाध्ये यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले.

    त्यांचे जन्मनाव राम फडके असे होते. त्यानंतर त्यांनी नाव बदलून सुधीर असे ठेवले. मराठी संगीत विश्वामध्ये त्यांना बाबूजी या नावानं ओळखले गेले. १९४१ मध्ये त्यांनी एचएमव्हीसोबत करिअरला सुरुवात केली.बाबूजींनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली होती. २९ जुलै २००२ रोजी ब्रेन हॅमरेजमुळे बाबूजींचे निधन झाले. आता प्रसिद्ध दिग्दर्शक योगेश देशपांडे हे बाबूजींच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यात प्रसिद्ध अभिनेता सुनील बर्वे हे सुधीर फडके यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

    Upcoming movie Swaraj Aaj Sudhir phadke.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!