UP religion Conversion Gang : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पकडलेल्या धर्मांतर गँगचे बीड कनेक्शन उजेडात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी बीडमधून इरफान शेख नावाच्या व्यक्तीस अटक केली आहे. इरफान केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयात काम करत असल्याचे सांगितले जात आहे. UP religion Conversion Gang beed Connection Exposed by ATS, arrested Irfan shaikh of parali
विशेष प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पकडलेल्या धर्मांतर गँगचे बीड कनेक्शन उजेडात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी बीडमधून इरफान शेख नावाच्या व्यक्तीस अटक केली आहे. इरफान केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयात काम करत असल्याचे सांगितले जात आहे. यूपी एटीएस धर्मांतर गँग प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात मोहम्मद उमर गौतम आणि मौलाना मुफ्ती काझी जहांगीर कासमी यांना अटक करण्यात आली आहे.
एटीएसच्या तपासणीत हे उघडकीस आले की या रॅकेटचे कनेक्शन केवळ यूपीच नाही, तर देशातील इतर राज्यांतही हे रॅकेट सक्रिय आहे. एटीएसच्या तपासणीत असे दिसून आले आहे की, आतापर्यंत देशभरात एक हजाराहून अधिक लोक धर्मांतरित झाले आहेत. यासंदर्भातील माहिती अन्य राज्यांच्या पोलिसांनाही दिली गेली.
याच प्रकरणात चौकशी सुरू असताना बीड पोलिसांनी एका कर्मचार्यास अटक केली असून त्याचे नाव इरफान शेख असे सांगितले जात आहे. इरफान हा बीडचा रहिवासी असून तो दिल्लीतील केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयात काम करतो. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याच मंत्रालयाशी संबंधित आणखी एका अधिकाऱ्याला अटक केली होती.
इरफानचे प्राथमिक शिक्षण परळी तालुक्यातील सिरसाळा या त्याच्या मूळ गावी झाले आहे. इरफान गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीत स्थायिक आहे. तिथे तो बालकल्याण विभागामध्ये दुभाषा म्हणून काम करतो. काही महिन्यांपूर्वी अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात इरफान खानला उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुकाची थापही मिळाली होती.
धर्मांतर रॅकेट प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक झाली आहे. मोहम्मद उमर गौतम आणि मौलाना कासमी, इरफान शेख, गुरुग्राम येथील मन्नू यादव आणि दिल्ली येथील राहुल भोला यांना चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली आहे.
UP religion Conversion Gang beed Connection Exposed by ATS, arrested Irfan shaikh of parali
महत्त्वाच्या बातम्या
- सेंट्रल व्हिस्टावर बंदीची मागणी करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही, दंड भरावा लागणार
- सुप्रीम कोर्टाचा राज्य, केंद्रशासित प्रदेशांना आदेश, 31 जुलैपर्यंत One Nation One Ration Card योजना लागू करा
- Moderna Vaccine : मॉडर्नाच्या लसीला डीजीसीआयकडून लवकरच मंजुरीची शक्यता, सिप्ला करू शकते आयात
- सोशल मीडियावर शरद पवारांचा आक्षेपार्ह फोटो शेअर करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
- पंजाब काँग्रेसमध्ये कलह : नवज्योतसिंग सिद्धूंना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीला बोलावले, राहुल आणि प्रियांकांची आज घेणार भेट