विशेष प्रतिनिधी
मुंबई : थंडीचा परिणाम राज्यातही दिसून येत आहे.दुसरीकडे शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी तापमानात कमालीची घट झली. पश्चिमी चक्रवातामुळे पुढील तीन ते चार दिवसराज्यातील तापमानात घट होईल, असं भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले. Untimely rains will increase the cold in state
राज्यात मागील २४ तासापासून पावसाचं वातावरण होतं. वातावरणात गारवा वाढत चालला आहे. त्यामुळे ही घट झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. महाबळेश्वर, दापोली, खेड आणि चिपळूणमध्ये मध्यरात्री पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे गारवा आणखी वाढला आहे. पुणे सह महाराष्ट्रात काही ठिकाणी २२ आणि २३ जानेवारीला पावसाची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे मध्यरात्री राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. मुंबई, पुणे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळल्या.
येत्या एक ते दोन दिवस मुंबईत थंडीचा प्रभाव कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत थंडी जास्त आहे. मुंबईत सहसा तितकीशी थंडी नसते मात्र अवकाळी पाऊस पडल्यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे.तर, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये २५ अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे. प्रामुख्याने धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला.