पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार नीलेश लंके यांनी रात्री उशिरा या कोरोना बाधितांची भेट घेतली. Until then, I am the parent of these students – MLA Nilesh Lanka
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील कोरोनाबधितांची संख्या रुग्णसंख्या ८२ झाली आहे. या कोरोना बाधितांवर पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार नीलेश लंके यांनी रात्री उशिरा या कोरोना बाधितांची भेट घेतली.
तसेच जोपर्यंत विद्यार्थी कोरोनामुक्त होणार नाहीत. तोपर्यंत मी या विद्यार्थ्यांचा पालक आहे असा आधार आमदार निलेश लंके यांनी रूग्णालयात जाऊन सर्व बाधित विद्यार्थ्यांना दिला आहे.या सर्व बाधित रुग्णांचा सर्व लागणारा खर्च निलेश लंके प्रतिष्ठान मार्फत मोफत केला जाईल.
प्रशासनाला व आरोग्य विभागाला सतर्क राहण्याची सूचना आमदार लंके यांनी दिल्यात.आमदार लंके यांनी मुलांचे मनोबल वाढवत म्हटले आहे की, पालक व विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, काळजी करू नये. उपचारासाठी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाईल, सर्वोत्तम उपचार केले जातील.
Until then, I am the parent of these students – MLA Nilesh Lanka
महत्त्वाच्या बातम्या
- लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंडला जर्मनीतून अटक
- लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंडला जर्मनीतून अटक
- पिंपरी : उद्या चिंचवड गावात येणार राज्यपाल केश्यारी
- मधुबन में राधिका नाचे गाण्यावर बोल्ड स्टेप्स, सनी लियोनीच्या अटकेची मागणी, सलमानवरही कारवाईचा आग्रह