• Download App
    एकीकडे एकनाथ खडसेंना गटनेता केल्याने राष्ट्रवादीत नाराजी; दुसरीकडे जळगाव जिल्हा बँकेतली सत्ताही गमावली!!|Unrest in NCP over eknath khadse's elevation as legislative council group leader

    एकीकडे एकनाथ खडसेंना गटनेता केल्याने राष्ट्रवादीत नाराजी; दुसरीकडे जळगाव जिल्हा बँकेतली सत्ताही गमावली!!

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपमधून राष्ट्रवादीत झालेल्या एकनाथ खडसे यांना विधान परिषदेतले गटनेतेपद दिले असले तरी त्याच्या दुसऱ्याच दिवशी जळगाव जिल्हा बँकेतली सत्ता भाजपने त्यांच्याकडून हिसकावून घेतली आणि त्या पाठोपाठ आता एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीतील नाराजीचा सामनाही करावा लागतो आहे.Unrest in NCP over eknath khadse’s elevation as legislative council group leader

    महाराष्ट्र भाजपातील नेत्यांशी पंगा घेऊन दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीने विधान परिषदेच्या गटनेते पदाची जबाबदारी दिली.
    त्यांच्या अनुभवाचा फायदा राष्ट्रवादीला होणार असला, तरी पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांना डावलत बाहेरून आलेल्यांना मोठी संधी दिली जात असल्याने राष्ट्रवादीत नाराजी असल्याच्या बातम्या आहेत.



    राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांच्या गटनेतेपदी नियुक्तीचे पत्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना देण्यात आले होते. शुक्रवारी त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, खडसे यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादीतील काही आमदार नाराज झाल्याची चर्चा आहे.

    राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे हे गटनेते पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने आयत्यावेळी त्यांचा पत्ता कापत एकनाथ खडसे यांना संधी दिली. खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे, त्याचा फायदा करून घेण्यासह जेष्ठत्त्वाच्या निकषावर त्यांची निवड केल्याचे वरिष्ठांचे म्हणणे आहे. परंतु, ज्येष्ठत्व आणि अनुभवाचा निकष लावला असेल, तर पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या रामराजे निंबाळकर का डावलण्यात आले, असा सवालही नाराज गटाने उपस्थित केला आहे.

    खडसेंना विरोध का?

    एकनाथ खडसे अनुभवी असले, तरी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अलिकडेच दाखल झाले आहेत. शिवाय सातत्याने आजारी पडत असल्याने, आक्रमक भाजपाला टक्कर देतील, अशी त्यांची शारीरिक स्थितीही नाही. अशावेळी एखाद्या तरूण नेत्याला संधी दिली असती, तर पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडता आली असती, असे काही आमदारांचे मत आहे.

    त्यातच विधान परिषदेतले गटनेते पद दिल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी एकनाथ खडसे यांना जळगाव जिल्हा बँकेतली हाता तोंडाशी आलेली सत्ता राष्ट्रवादीला गमवावी लागली. वास्तविक जळगाव जिल्हा बँकेत एकनाथ खडसेंच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने बहुमत मिळवले होते. पण हे बहुमत असूनही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार हे भाजपच्या सहाय्याने निवडून आले. त्यामुळे देखील खडसे यांच्यावरची राष्ट्रवादीचे आमदारांची नाराजी वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    Unrest in NCP over eknath khadse’s elevation as legislative council group leader

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस