• Download App
    आदिवासींच्या डी - लिस्टिंग महामेळाव्याला नाशिक मध्ये अभूतपूर्व प्रतिसाद!! Unprecedented response to tribal de-listing rally in Nashik

    आदिवासींच्या डी – लिस्टिंग महामेळाव्याला नाशिक मध्ये अभूतपूर्व प्रतिसाद!!

    गेली 70 वर्ष झालेल्या अन्यायाविरुद्ध आदिवासी समाजाने पेटून उठावे; निवृत्त न्यायाधीश प्रकाश उईकेंचे आवाहन

    प्रतिनिधी

    नाशिक : आदिवासी समाजावर गेली 70 वर्ष झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जनजाती सुरक्षा मंच, महाराष्ट्र तर्फे आज भव्य डी – लिस्टिंग महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत नाशिक, पुणे नगर तसेच सोलापूर जिल्ह्यातून हजारो जनजाती बांधवांनी सहभागी होऊन धर्मांतरित आदिवासींना अनुसूचित जमातींच्या यादीतून वगळण्याची एकमुखी मागणी केली. Unprecedented response to tribal de-listing rally in Nashik

    महामेळाव्याच्या सुरुवातीला गोल्फ क्लब मैदान येथून भव्य रॅली काढली. शहराच्या विविध भागातून रॅलीने मार्गस्थ होत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर भव्य महामेळाव्यात त्याचे रूपांतर झाले.

    ‘कोंबडं हरवलं, कंच्या देवाला मानविलं’ आणि ‘गौराई चाललीव’ या आणि यांसरख्या लोकागीतांवर गोप नृत्य, पावरी (तारपा), फुगडी नृत्यी यांसारख्या परंपरागत आदिवासी लोकनृत्याच्या सादरीकरणाने जनजाती सुरक्षा मंच, महाराष्ट्रच्या वतीने नशिक येथे २९ ऑक्टोबर रोजी गोल्फ क्लब मैदानावर आयोजित डी – लिस्टिंग महामेळाव्याची सुरुवात झाली. प्रसिद्ध आदिवासी राजकीय नेते स्वर्गीय श्री बाबा कार्तिक उंराव यांची जयंतीच्या निमित्ताने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

    महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेल्या जन जातीयांच्या मोर्चाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तारपा नृत्याने मोर्चाची सुरुवात करत गोल्फ क्लब मैदानावरून मोर्चा निघाला आणि त्र्यंबक नाका सिग्नल, अण्णाभाऊ साठे पुतळा, कालिदास कला मंदिर, शिवसेना भवन, सी बी एस सिग्नल वरून त्र्यंबक नाकामार्गे पुन्हा गोल्फ क्लब मैदान येथे त्याचे महामेळाव्यात रूपांतर झाले. डी – लिस्टिंग म्हणजेच धर्मांतरीत व्यक्तींना अनुसूचित जमतींच्या यादीतून वगळण्यासाठी सरकारकडून मागणी करण्याकरिता सगळा आदिवासी समज जमला होता.

    निवृत्त जिल्हा न्यायाधीश, मध्य प्रदेश येथील जनजाती गौंड नेते निवृत्त न्यायाधीश प्रकाश उईके हे प्रमुख वक्ते म्हणून मेळाव्यासाठी उपस्थित होते. जनजाती समाजावर डी – लिस्टिंग कायदा नसल्यामुळे कशाप्रकारे नुकसान होत आहे, याची अत्यंत सूत्रबद्ध मांडणी केली. माऊलीधाम, त्र्यंबकेश्वरचे रघुनाथ महाराज (देवबाप्पा) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. धर्मधाम आश्रम, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा येथील प. पू. श्री रामणगिरी गुरू यांची देखील विशेष उपस्थिती या मेळाव्याला होती.

    केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री, भारती पवार, आयुर्वेदाचार्य श्री. संभाजी महाराज पारधी , पुणे, आयुर्वेदाचार्य श्री. महंत बाळासाहेब महाराज कोंडार, अकोले, ह.भ.प. श्री. सहजानंद महाराज (प. पू. दयानंद महाराज यांचे उत्तराधिकारी), श्री. क्षेत्र सराड ह.भ.प, श्री.देवराम बाबा गाडर, पेठ, ह.भ.प.महंत तारामाई बागुल, घनशेत, भागवत देशमुख ह.भ.प. श्री. काशिनाथ बाबा भोये, खोरीपाडेकर, ह.भ.प.श्री. हिरामण बाबा घुलूम, ओझरखेड, ह.भ.प. श्री. जानुबाबा, गडदवने, मा.सौ.कविताताई राऊत(तुंगार) अंतरराष्ट्रीय धावपटू, ह.भ.प. बाबासाहेब माळी, संगमनेर, दीपक बर्डे आणि भागवत देशमुख महाराज हे प्रमुख मान्यवर म्हणून मेळाव्याला उपस्थित होते.

    यावेळी व्यासपीठावर जनजाती सुरक्षा मंचाचे संयोजक श्री. पांडुरंग भांगरे, सहसंयोजक एड. श्री गोरक्षनाथ चौधरी आणि एड. किरण गबाले उपस्थित होते. जनजाती सुरक्षा मंच, प्रदेश प्रवक्ते, युवराज लांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

    Unprecedented response to tribal de-listing rally in Nashik

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ