विशेष प्रतिनिधी
सोलापूर – मकाई साखर कारखान्याने विनापरवाना गाळप केले. त्यामुळे साखर आयुक्तांनी प्रति टन ५०० रुपये दंड कारखान्याला ठोठावला आहे. Unlicensed grinding from makai sugar factory; Sugar commissioner slaps Rs 5 crore fine
गाळप हंगाम २९२०- २१ मधील शेतकऱ्यांची संपूर्ण एफआरपी न दिल्याने साखर आयुक्तांनी मकाई कारखान्याला गाळप परवाना नाकारला होता. मात्र बेकायदेशीरपणे गाळप सुरू केले.
१ लाख १२ हजार ६०५ टन ऊसाचे विना परवाना गाळप केलेले आहे. विना परवा परवाना गाळप केलेल्या ऊस ऊस गाळपावर रु.५०० प्रति टन प्रमाणे पाच कोटी त्रेसष्ट लाख दोन हजार पाचशे रुपयांचा दंड आकारला आहे. सदर दंडाची रक्कम मकाई सहकारी साखर कारखाना लि भिलारवाडी पोस्ट जिंती, ता. करमाळा जि. सोलापूर यांनी आदेश झाल्यापासून १५ दिवसाच्या आत शासकीय कोषागारात भरणा करावी असा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढला आहे.
Unlicensed grinding from makai sugar factory; Sugar commissioner slaps Rs 5 crore fine
महत्त्वाच्या बातम्या
- विहिरी वरील स्लॅब तुटुन पाण्यात बुडाल्याने १३ जणांचा मृत्यू; उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात भीषण दुर्घटना
- भुजबळांच्या बेनामी प्रॉपर्टीची पाहणी केल्याबद्दल पोलिसांची नोटीस : किरीट सोमय्या; पण नोटीस नेमकी कशासाठी?
- कोरोना लसीकरणाचा आकडा 174 कोटी
- पाण्याचा जार डोक्यात अडकलेल्या बिबट्याची तीन दिवसानंतर सुटका; प्राणिमित्रांकडून जीवदान