• Download App
    मालेगाव 28 भिवंडी 18; जिंतूर, सेलू 20 : राज्यात महाविकास आघाडीची एकी; राष्ट्रवादी - काँग्रेसची खेचाखेची!!Unity of Mahavikas Aghadi in the state; NCP - Congress pull

    मालेगाव २८ भिवंडी १८; जिंतूर, सेलू २० : राज्यात महाविकास आघाडीची एकी; राष्ट्रवादी – काँग्रेसची खेचाखेची!!

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी सत्तेवर असली तरी जिल्ह्या – जिल्ह्यांच्या आणि तालुक्या – तालुक्यात स्थानिक पातळीवर या तीनही पक्षांमध्ये जोरदार राजकीय स्पर्धा आहे. त्यामुळे “राज्यात महाविकास आघाडीची एकी आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खेचाखेची”, अशी राजकीय अवस्था महाराष्ट्रात दिसत आहे.Unity of Mahavikas Aghadi in the state; NCP – Congress pull

    मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसने मालेगाव मध्ये काँग्रेसचे 28 नगरसेवक फोडून राष्ट्रवादीत घेतले. त्याआधी भिवंडीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसवर हाच “प्रयोग” केला. तेथे काँग्रेसचे 18 नगरसेवक फोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले.



    आज त्याचा राजकीय बदला काँग्रेसने मराठवाड्यात घेतला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि सेलू नगरपरिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 नगरसेवक फोडून काँग्रेसने आपल्या पक्षात घेतले. जिंतूर मधले नगराध्यक्ष देखील राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे जिंतूर नगरपरिषदेची सत्ता काँग्रेसने राष्ट्रवादी कडून खेचून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

    या खेचाखेचीच्या मुद्द्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परखड मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीने भिवंडी, मालेगावातले आमचे नगरसेवक फोडले नसते तर काँग्रेसला आज राष्ट्रवादी फोडण्याची गरज नव्हती. तीनही पक्षांनी समन्वयाने राज्य करावे असे आमचे मत आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचा पक्ष फोडत असेल तर आम्हालाही आमचा पक्ष वाढविण्यासाठी दुसरा पर्याय नाही, असे नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला सुनावले.

    Unity of Mahavikas Aghadi in the state; NCP – Congress pull

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही