विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी परिसरातील आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठात कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या सिंथेटिक ट्रॅकवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट गाड्या घातल्या. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनीही नाराजी व्यक्त केली होती. देशात क्रीडा सुविधा कमी आहेत.Union Sports Minister Kiran Rijiju is also angry over the use of vehicles on synthetic tracks.
सर्वच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची देखभाल नीट करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, क्रीडामंडी सुनील केदार, क्रिडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या गाड्यांचा समावेश होता. या गाड्या थेट ट्रॅकवर उभ्या करण्यात आल्यामुळे क्रिडाप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यावरुन भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
बालेवाडी परिसरात उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार, सुनील केदार, अदिती तटकरे पोहोचले होते. त्यावेळी त्या मंत्र्यांचा ताफा थेट स्टेडियमच्या ट्रॅकवर उभ्या करण्यात आल्या होत्या. स्टेडियममधील क्रीडा अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळेच मंत्र्यांच्या गाड्या उभ्या करण्यात आल्या.
या संपूर्ण प्रकारावर भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केलीय. खेळाडूंची उंची वाढवायचं सोडून त्यांची ऊर्जा कमी करण्यांच काम करत आहेत. क्रिडा मंत्र्यांनीही यावर हास्यास्पद स्पष्टीकरण दिलं जात आहे. या घटनेमुळं खेळाडूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी आमदारांनी केली आहे.
Union Sports Minister Kiran Rijiju is also angry over the use of vehicles on synthetic tracks.
महत्त्वाच्या बातम्या
- बोलतो त्याप्रमाणे चालतो याचा अर्थ वाघ सर्कशीतलाच, त्याचा रिंगमास्टरही वेगळा, नारायण राणे यांचा शिवसेनेला टोला
- ओबीसी आरक्षणात आता चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्या विवाहाची
- कुणी आम्हाला डिवचले, धमकी दिली तर धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
- गांधी परिवारवादाचे ठीक आहे, पण “असे” राजकीय वारसे सोडून दिल्याने विरोधकांच्या हातात आयते कोलित मिळते त्याचे काय…??