बदलापूर दौरा अनेक अर्थांनी चर्चेत राहिला. कपिल पाटलांनी मास्क नसेल तर बुके स्वीकारणार नसल्याचा पवित्रा घेतला.
विशेष प्रतिनिधी
ठाणे : देशासह महाराष्ट्रातही भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची बदलापूरमध्ये जन आशीर्वाद यात्रा काल पार पडली. त्यांची बदलापूरमधील यात्रा अनेक अर्थांनी चर्चेत राहिली. मास्कविना बुके स्वीकारणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. Union ministers in Jana Aashirwad Yatra, will not take bouquets without masks, Kapil Patil’s Badlapur Tour
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे राज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या मतदारसंघातील बदलापूर शहरात आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. गर्दी पाहून कपिल पाटील यांनी कोरोना नियम पाळण्याचं आवाहन केलं.
‘मास्क असेल तरच बुके स्वीकारणार’
कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला होता. कपिल पाटील बदलापुरात मास्क लावून फिरत होते. त्यातच त्यांच्या भोवताली स्वागत करण्यासाठी जमलेल्या लोकांनी मोठा घोळका घातला होता. मात्र, यावेळी अनेक कार्यकर्ते फोटोसेशनसाठी मास्क काढून बुके देत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ज्याने मास्क घातला असेल त्याच्याच हातून बुके घेऊ, अशी भूमिका घेत कपिल पाटील यांनी अनेकांना मास्क घालायला लावले.
कपिल यांच्या स्वागतासाठी झालेल्या लोकांच्या गर्दीतून कोरोना वाढू नये, हीच अपेक्षा व्यक्त होताना दिसतेय. या यात्रेतील गर्दी प्रकरणी कल्याण डोंबिवलीत चार गुन्हे दाखल करण्यात आले असून आता अंबरनाथ आणि बदलापूर शहरातही गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कपिल पाटील यांची जनआशिर्वाद यात्रा काल बदलापुरातून गेली. बदलापूर शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वाढून रस्त्यावर आल्या आहेत. याचाच फटका केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनाही बसला. कपिल पाटील यांच्यासह आमदार किसन कथोरे आणि अन्य स्थानिक नेते हे रथावर उभे असताना अचानक झाडांच्या फांद्या अंगावर येऊ लागल्या. त्यामुळे कपिल पाटील, किसन कथोरे यांना अनेकदा उठबस करावी लागली. दुरूनच झाड दिसलं, की कपिल पाटील रथातच खाली बसायचे अन झाड गेलं की पुन्हा उभे राहायचे.
केंद्रीय राज्यमंत्र्यांसोबत घडलेल्या प्रकारामुळे बदलापूर पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. बदलापूर पालिकेनं पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या खरोखरच छाटल्या होत्या का? असा प्रश्नही विचारला जात आहे.
Union ministers in Jana Aashirwad Yatra, will not take bouquets without masks, Kapil Patil’s Badlapur Tour
महत्वाच्या बातम्या
- अफगणिस्थानमधील पराभवाचे खापर ज्यो बायडेन यांच्यावर, अमेरिकेतील लोकप्रियता सात टक्यांनी घटली
- मुलगा व्हावा म्हणून पत्नीचा आठ वेळा गर्भपात, स्टेरॉईडसची दीड हजार इंजेक्शन, निवृत्त न्यायाधिशांच्या मुलीने केली पोलीसांत तक्रार
- नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची मध्य प्रदेशला भेट, ३५ दिवसांत नवीन उड्डाणे सुरू
- हरियाणा सरकारने घातली गौरखधंदा शब्दावर बंदी, संत गोरखनाथ यांच्या अनुयायांच्या भावना दुखू नये म्हणून निर्णय