Union Minister Ramdas Athawale : प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; 2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी ! नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी; मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत नरेंद्र मोदी? असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत म्हटले आहे. प्रशांत किशोर हे 2014 च्या निवडणुकित नरेंद्र मोदींसोबत होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत प्रशांत किशोर मोदींसोबत नव्हते तरीही 2019 च्या निवडणुकीत 303 जागा मिळवीत मोठा विजय मोदींच्या नेतृत्वात भाजपला मिळाला. ज्या राज्यात प्रशांत किशोर यांनी प्रचार केला नाही त्या राज्यांत ही भाजप ला विजय मिळालेला आहे. त्यामुळे माझे म्हणणे आहे प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी कारण 2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी असे ना. रामदास आठवले आज मुंबईत संविधान निवासस्थानी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हटले. विरोधी पक्षांमध्ये एकजूट नाही. त्यांच्यात एकमत नाही. एनडीए सोबत नसणारे विरोधी पक्षातील अनेक पक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसोबत आहेत. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी येत्या 2024 च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप एनडीए प्रचंड बहुमत मिळवून विजयी होतील आणि पुन्हा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. Union Minister Ramdas Athawale Criticizes Sharad Pawar And Prashant Kishor Through His Poem
महत्त्वाच्या बातम्या
- Covid Alarm : ब्रिटिश शास्त्रज्ञांनी बनवला कोविड अलार्म, आता तपासणीशिवाय 15 मिनिटांत होईल कोरोनाग्रस्तांची ओळख
- बसपाचे बंडखोर आमदार अखिलेश यादवांना भेटले, पक्ष प्रवेशाच्या चर्चांना उधाण, मायावतींना मोठा धक्का
- Antilia Case : मनसुख हिरेन हत्येप्रकरणी NIA कडून दोन जणांना अटक, 21 जूनपर्यंत कोठडी
- मुजोर चीनला आर्थिक आघाडीवर उत्तर, 43 टक्के भारतीयांकडून वर्षभरात एकाही चिनी वस्तूची खरेदी नाही
- कोरोना लसीमुळे देशात पहिला मृत्यू झाल्याचा सरकारी समितीचा खुलासा, लस घेतल्यावर कोणती लक्षणे गांभीर्याने घ्यावी, वाचा सविस्तर…