• Download App
    'किराणा दुकानात आला दारूचा माल, आता लोकांचे होणार हाल', रामदास आठवलेंची ठाकरे सरकारच्या निर्णयावर काव्यमय प्रतिक्रिया|Union Minister Ramdas Athavale poetic reaction to Thackeray government's decision OF Wine Sell in Super Market

    ‘किराणा दुकानात आला दारूचा माल, आता लोकांचे होणार हाल’, रामदास आठवलेंची ठाकरे सरकारच्या निर्णयावर काव्यमय प्रतिक्रिया

    ठाकरे सरकारने राज्यात सुपरमार्केट, किराणा दुकानांतून वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यापासून मोठा गदारोळ उडाला आहे. विरोधी पक्ष भाजपने यावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे, तर शिवसेना तथा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या निर्णयाचं समर्थन होताना दिसतंय. दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही या निर्णयावर खास आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.Union Minister Ramdas Athavale poetic reaction to Thackeray government’s decision OF Wine Sell in Super Market


    प्रतिनिधी

    मुंबई : ठाकरे सरकारने राज्यात सुपरमार्केट, किराणा दुकानांतून वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यापासून मोठा गदारोळ उडाला आहे. विरोधी पक्ष भाजपने यावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे, तर शिवसेना तथा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या निर्णयाचं समर्थन होताना दिसतंय. दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही या निर्णयावर खास आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.

    केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते. यावेळी राजभवनात पर्यावरण पुरस्कार सोहळा पार पडला. सोहळ्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आठवले म्हणाले की, किराणा दुकानात आला दारूचा माल,



    आता लोकांचे होणार हाल असे म्हणत आठवले यांनी राज्य सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं. दारू आणि वाईन एकच आहेत. अजितदादांचं म्हणणं चुकीचं आहे. या निर्णयाविरोधात आरपीआय आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

    दरम्यान, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरही आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, महाविकास आघाडीने राज्यपाल नियुक्त सर्व आमदारांची नावे राज्यपालांना पाठवावी. रजनी पाटील यांच्यासह काही नावं बदलावी लागणार आहेत. नावांची यादी लवकर पाठवली तर राज्यपाल त्यावर लवकर निर्णय घेतील, असंही ते म्हणाले.

    महापालिका निवडणुकांविषयी आठवले म्हणाले की, एप्रिल महिन्यात महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपा आणि आरपीआय निवडणूक जिंकेल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळे निवडणूक लढतील. त्यामुळे भाजप आणि आरपीआय शिवसेनेला पराभूत करेल. टिपू सुलतान यांचं नाव उद्यानाला दिल्याचं माहीत नाही, असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.

    Union Minister Ramdas Athavale poetic reaction to Thackeray government’s decision OF Wine Sell in Super Market

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा