• Download App
    ‘परमब्रम्हा’ या सुपर कॉम्प्युटरची पाहणी केली, त्याचबरोबर आण्विक चुंबकीय अनुनाद केंद्रालाही दिली भेट |Union Minister Of State For Education Dr Subhash Sarkar Visited To IISER Pune..

    केंद्रीय राज्यमंत्री सुभास सरकार यांची ‘IISER’ला भेट ..

    • परमब्रम्हा’ या सुपर कॉम्प्युटरची पाहणी केली, त्याचबरोबर आण्विक चुंबकीय अनुनाद केंद्रालाही दिली भेट

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ . सुभास सरकार यांनी पुण्यातील भारतीय वैज्ञानिक शिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात आयसर ला भेट देऊन पाहणी केली आणि संस्थेच्या संचालकांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली . संस्थेच्या संशोधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता प्रा. रंजन बॅनर्जी यांनी डॉ. सरकार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संस्थेच्या अनेकविध उपक्रमांची त्याचबरोबर भावी वाटचालीविषयी डॉ. सरकार यांना सादरीकरणासह माहिती देण्यात आली. संस्थेचे विविध अधिष्ठाता आणि विभाग प्रमुख यावेळी झालेल्या चर्चेत सहभागी झाले होते .Union Minister Of State For Education Dr Subhash Sarkar Visited To IISER Pune..



    त्यानंतर डॉ. सरकार यांनी संस्थेमधील सर्वात वेगवान आणि अचूक काम करणाऱ्या परमब्रम्हा या सुपर कॉम्प्युटरची पाहणी केली, त्याचबरोबर आण्विक चुंबकीय अनुनाद केंद्रालाही त्यांनी भेट देऊन कार्यप्रणाली समजावून घेतली.

    संस्थेमधील रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विभागाबरोबरच आरोग्य विज्ञान केंद्रालाही डॉ. सरकार यांनी यावेळी भेट दिली आणि सध्या सुरु असलेल्या संशोधन कार्याविषयी माहिती घेतली. आयसर मध्ये सुरु असलेल्या संशोधनात्मक कार्याबद्दल डॉ . सरकार यांनी यावेळी समाधान व्यक्त केले आणि केंद्र सरकारकडून संस्थेला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली .

    Union Minister Of State For Education Dr Subhash Sarkar Visited To IISER Pune..

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनाेज जरांगेंचा अडेलतट्टूपणा कायम, आझाद मैदानातून उठणार नसल्याची भूमिका

    मराठा आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; मुंबई पोलिसांनी जारी केली ट्रॅफिक ॲडव्हायझरी!!

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन; ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीवर लगावला टोला