प्रतिनिधी
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची बातमी समोर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने तीन वेळा फोन आल्याचे या बातमीत म्हटले आहे. त्यामुळे नितीन गडकरींच्या नागपूर कार्यालयाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
…तर गडकरींना जीवे मारू
नितीन गडकरींच्या ऑरेंज सिटीजवळील जनसंपर्क कार्यालयात आज सकाळपासून 3 फोन आले. सकाळी ११.३० वाजल्याच्या सुमारास दोन वेळेला आणि १२.३२ वाजता असे तीन वेळा धमकीचे कॉल आले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या फोनमध्ये दाऊद असा शब्द उच्चारण्यात आला होता. खंडणीची मागणी करण्याचा आशय त्या फोनमध्ये होता. जर खंडणी दिली नाही, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारू, अशी धमकी फोनद्वारे देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नितीन गडकरी आज नागपुरात
दाऊद इब्राहिमच्या नावाने आलेल्या धमकीच्या फोनबाबत तातडीने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नागपूर वरिष्ठ पोलिसांना माहिती दिली. नागपूरच्या सायबर सेलला माहिती देण्यात आल्यानंतर कार्यालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून या फोनसंदर्भात अधिक तपास केला जात आहे. आज नितीन गडकरी नागपूरता असून सध्या ते एका कार्यक्रमात आहेत. त्याठिकाणी पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत चोख बंदोबस्त केला आहे.
Union minister Nitin Gadkari’s office landline received three calls
महत्वाच्या बातम्या
- कौशल्य विकासच्या रोजगार मेळाव्यात 14 हजार 90 जागांसाठी मुलाखती, लवकरच नोकरीची संधी
- शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची; १७ जानेवारीला सुनावणी, पण फैसला कधी आणि कशाच्या आधारावर??; वाचा तपशील
- 21 पक्षांना पत्र पाठवून काँग्रेस विरोधकांची एकी साधतेय की बेकी??
- जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख चौधरींचे निधन; भारत जोडो यात्रेत राहुलजींसोबत चालताना हार्ट अटॅक