वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीस यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट..
विशेष प्रतिनिधी
पुणे : आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा 66 वा वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.. त्यांचा वाढदिवस आज विविध प्रकारे साजरा होतोय..Union Minister Nitin Gadkari’s 66th birthday. Wishes poured in from many..
त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सकाळी त्यांना पारंपारिक पद्धतीने औक्षण करून मंत्रघोषाच्या निनादात शुभेच्छा दिल्या.
समाज माध्यमातून देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ..राजकारणातील, समाजकारणातील, व्यावसायिक आशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींनी नितीन गडकरी यांना शुभेच्छा दिल्यात आहेत..
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नागपूर इथं प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले..
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील नितीन गडकरी यांना समाज माध्यमातून त्यांच्यासोबत चा फोटो आणि पोस्ट शेअर करत हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृता फडणवीस लिहितात
“अंदाज कुछ अलग है उनके सोचने का सबको मंजिल का शोक है.. और उन्हे रास्ते बनाने का “..
अमृता फडणवीस यांच्या पोस्टवर अनेक नेटकरांनी नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आहेत..
अमृता फडणवीस समाज माध्यमातून कायमच सक्रिय असतात.. आपल्या गाण्याची विविध व्हिडिओज फोटोज त्या आपल्या चाहतांसोबत शेअर करत असतात..
Union Minister Nitin Gadkari’s 66th birthday. Wishes poured in from many..
महत्वाच्या बातम्या
- नवीन संसद भवनात ‘एक भारत, सर्वोत्तम भारत’ची झलक; महाराष्ट्रातून सागवान, राजस्थानचे संगमरवर तर उत्तर प्रदेशातून कार्पेट!
- समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर दुसऱ्या टप्प्याचे शिंदे – फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण
- मोदी सरकारची 9 वर्षे : काँग्रेसचे 9 प्रश्न; सरकारचे 9 निर्णय!!
- सावरकर जयंती निमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वस्तीगृहातली खोली सामान्यांसाठी खुली..