• Download App
    वडेट्टीवारांनी बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये : गडकरींचा इशाराUnion minister Nitin Gadkari slammed congress state minister Vijay Wadettivar and warned him to be responsible

    वडेट्टीवारांनी बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये – गडकरींचा इशारा

    केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितिन गडकरी मोकळंढाकळं वागण्या-बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण ते बेजबाबदार आहेत का? त्यांच्याच पक्षातले त्यांचे तरुण सहकारी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ते बेछूट बोलतील का?…आणि तेही विरोधी पक्षाच्या कॉंग्रेस नेत्याकडे? Union minister Nitin Gadkari slammed congress state minister Vijay Wadettivar and warned him to be responsible


    प्रतिनिधी

    नागपूर : “विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात महाराष्ट्राचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना मी कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही. वडेट्टीवारांनी तशी वक्तव्ये करून बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये,” असे केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सुनावले आहे.

    “फडणवीस यांच्या विरोधात गडकरी यांनी आपल्याला गुपचूप काही तरी सांगितले, असे जे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे,” असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

    फडणवीस माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत, असे सांगून गडक़री म्हणाले की फडणवीस माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. एकमेकांच्या विरोधात काड्या करणे आणि एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम काँग्रेसचे मंत्री वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहत आहेत.

    “फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्राची प्रगती झाली. विरोधी पक्ष नेते म्हणूनही ते उत्तम काम करीत आहेत. महाआघाडीच्या चुकांवर नेमके बोट ठेवून ते लोकशाहीतील विरोधकांचे कर्तव्य निभावत आहेत. सरकार तीन पक्षांचे असले तरी काँग्रेसमध्ये नैराश्य आहे. त्यांना कुणीही मोजत नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसी नेते अशा प्रकारची वक्तव्ये करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात,” असा आरोपही गडकरी यांनी केला आहे.

    Union minister Nitin Gadkari slammed congress state minister Vijay Wadettivar and warned him to be responsible

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!