• Download App
    करोडोंना छत्रपती शिवराय खऱ्या अर्थाने समजले ते बाबासाहेब पुरंदरेंमुळेच.. गडकरींची श्रद्धासुमनेUnion minister Nitin Gadkari paid rich tribute to Babasaheb Purandare

    करोडोंना छत्रपती शिवराय खऱ्या अर्थाने समजले ते बाबासाहेब पुरंदरेंमुळेच.. गडकरींची श्रद्धासुमने

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आम्हांला आणि आमच्यासारख्या करोडो लोकांना शिवराय खऱ्या अर्थाने समजले ते बाबासाहेबांमुळेच… अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली. शतायुषी बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत सकाळी मावळली आणि प्रदेश देश आणि जगभरातून श्रद्धांजलीचा महापूर आला आहे.Union minister Nitin Gadkari paid rich tribute to Babasaheb Purandare

    गडकरी श्रद्धांजली वाहताना म्हणाले :

    “अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, जेष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

     

    एका दिव्य दृष्टीच्या दिग्दर्शक, अभिनेता, कलावंत, संघटक, लेखक, संशोधक, वक्ता आणि सर्वस्पर्शी अशा व्यक्तिमत्त्वास आज महाराष्ट्र मुकला आहे. अनेक दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, गिर्यारोहक, लेखक, वक्ते, संशोधक, दिग्दर्शक, अभिनेते, कवी, छायाचित्रकार, नेपथ्यकार घडवणाऱ्या बाबासाहेबांचे योगदान अक्षरशः थक्क करायला लावणारे असेच आहे.

    वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करून शतायुषी होत असलेल्या सर्वार्थाने शिवमय अशा बाबासाहेबांच्या मनातील उत्साह आणि ऊर्जा, नवनवीन प्रकल्पांच्या कल्पना, वाचन, अभ्यास हे सारेच नेहमीच प्रेरणादायी आणि भारावून टाकणारे असेच होते.

    नुकतीच पुण्यात त्यांची भेट घेतली होती, तेव्हा शतायुषी बाबासाहेब पुढेही त्यांच्या वाणीतून शिवराय जिवंत करत राहतील ज्यातून आणखी एक पिढी घडेल, असा ठाम विश्वास होता.

    आणखी करोडो हृदये प्रज्ज्वलित होतील आणि बाबासाहेबांची वाणी त्यांना प्रेरणा देत राहील असा विश्वास होता. शेवटी एवढंच म्हणेन, बाबासाहेब आपण अजून हवे होतात!”

     

    Union minister Nitin Gadkari paid rich tribute to Babasaheb Purandare

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!